शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लोकनियुक्तीच्या पसंतीला न्याय देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:22 IST

भूषण रामराजे लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद या सधन गावाचे सरपंचपद भूषवणा-या अक्काबाई रमेश ठाकरे ह्या ...

भूषण रामराजेलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद या सधन गावाचे सरपंचपद भूषवणा-या अक्काबाई रमेश ठाकरे ह्या अत्यंत साधारण अशा कुटूंबातून पुढे आल्या आहेत. अवघ्या २४ वर्ष वयात त्यांनी ही जबाबदारी घेत मार्गक्रमण केले होते. गावातील वरिष्ठांचा सल्ला घेत त्या ग्रामपंचायतीचे कामकाज करत आहेत. युवा म्हणून गावासह संपूर्ण जिल्ह्यातील युवती आणि महिलांसाठी त्या प्रेरणा आहेत. कुटूंबाचा सांभाळ करत त्यांची वाटचाल सुरु आहे. 

लोकनियुक्त सरपंच असल्याने आपल्याला ग्रामपंचायतीत जावेच लागेल याची त्यांना जाणीव होती. यातून मग अनेक बाबींचा अभ्यास त्यांनी करुन घेतला. गावासाठीच्या योजना, पेसा कायदा, वित्त आयोग, केंद्राच्या योजना, घरकुल, महिलांच्या योजना, ग्रामस्वच्छता अभियान तसेच गाव विकासाच्या इतर योजनांची माहिती त्यांनी पती रमेश ठाकरे तसेच गावातील ज्येष्ठ, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच तालुक्यातील अधिकारी वर्गांकडून जाणून घेतली. यातून त्या गावासाठी कोणत्या योजना आणता येतील, विकास कसा होईल याबाबत सतत सदस्य व ज्येष्ठांसोबत चर्चा करत आहेत. सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत अक्काबाई ह्या ग्रामपंचायत कार्यालयात थांबून असतात. घरी गेल्यावरही गावातील कोणी समस्या घेवून आल्यास त्याच्याकडे लक्ष देतात. अक्काबाई ठाकरे यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले असल्याने त्या साक्षर आहेत. यातून गावात होणा-या विकास कामांची पाहणी करण्यासह नव्या योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करतात. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना पती, मुलगा व सासरे यांच्याकडे लक्ष देत स्वत: सर्व घर सांभाळतात. साधारण अशा घरात राहून उदरनिर्वाहला मोलमजूरी करुनही केवळ समाजकार्याची आवड असल्याने तीन वर्षांपूर्वी निवडणूकीत सहभाग घेतला. यातून जिल्ह्यातील पहिली महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून येण्याचा मान अक्काबाई ठाकरे यांना मिळाला. हा सन्मान मिळवल्यानंतर त्या धडाडीने गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

म्हसावद या गावाला राष्ट्रीय पातळीवर न्यायचे आहे. गावातील विकास कामांचा वेग वाढवयाचा आहे. गावात रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी व सांडपाणी निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला सरपंच असल्याचा न्यूनगंड कधीही बाळगला नाही. ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्य हे वेळोवेळी मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या सांगतात. त्यावर कामकाज करुन त्या सोडवण्याचा प्रयत्न करते. वेळप्रसंगी तालुका व जिल्हा प्रशासनातील अधिका-यांना माहिती दिली जाते. -अक्काबाई ठाकरे, सरपंच. म्हसावद ता. शहादा