शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील खगोलप्रेमींनी घेतला सूर्यग्रहणाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्षातले पहिले सूर्यग्रहण आज रविवारी सकाळी १० वाजून १ मिनिटांनी सुरू झाले. शहरातील होळतर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षातले पहिले सूर्यग्रहण आज रविवारी सकाळी १० वाजून १ मिनिटांनी सुरू झाले. शहरातील होळतर्फे हवेली परिसरात आशापुरी माता फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर तर्फे खगोल प्रेमींसाठी ग्रहण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. नंदुरबारात ग्रहण काळात ७० ते ७५ टक्के सूर्यबिंबाचा भाग झाकला गेला होता. ढगाळ वातारणाचा फारसा परिणाम दिसून आला नाही.सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. परंतु ग्रहण काळ सुरू होण्याच्या आधी ढगांची गर्दी आकाशात कमी झाल्याने सूर्यबिंब पुर्ण दिसू लागले. त्यामुळे खगोलप्रेमींमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रहण लागल्यापासून संपेपर्यंतच्या कालावधीत अल्पकाळ सूर्य ढगांच्या आड गेला होता. त्यामुळे सूर्यग्रहण पहाण्यात फारशी अडचण झाली नसल्याचे चित्र जिल्हाभरात होते. प्राचीन काळी विज्ञान प्रगत नव्हते. विज्ञानाच्या घडामोडींबद्दल नागरिकांना माहिती नव्हती. त्यामुळे ग्रहणाविषययी विविध गैरसमज होते. आता मात्र तसे नाही. त्यामुळे रविवारचे सूर्यग्रहण अनेकांनी पाहिले.नंदुरबारात सूर्यबिंबाचा ७० ते ७५ टक्के भाग झाकलेला दिसत होता. त्यामुळे शहरात ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळाला. सकाळी १०.१ ते दुपारी १.३० या कालावधीत घराच्या छतावर जाऊन नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव विशिष्ट चष्म्यातून घेतला. खगोल प्रेमींसाठी ग्रहण पाहणे पर्वणीच असते.शहरातील श्री.आशापुरी माता फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटील व त्यांचा पत्नी खगोल अभ्यासक चेतना पाटील यांनी ग्रहण पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली होती. उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी स्वाती पाटील, भाग्येश पाटील, हेमंत अहिरे, निलेश पाटील, आर्या पाटील उपस्थित होते.

ग्रहनकाळात गर्भवती महिलांनी भाज्या चिरु नये, त्याचप्रमाणे काही खाऊ नये,पाणी पिऊ नये अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आजही मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात.या सर्व अंधश्रद्धा ना झुगारून शहादा येथील अनेक महिला व तरुणी यांनी ही सर्व कामे जाहीरपणे करून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचा प्रयत्न केला. कुलकर्णी रुग्णालयाच्या छतावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिका व बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका कुलकर्णी, अंनिसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, अंनिस चे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, शाखा उपाध्यक्ष संगीता पाटील, अशोक पाटील, साजिद शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती असे तीन प्रकारचे सूर्यग्रहण पाहायला मिळत असतात. जिल्ह्यात दिसलेले सूर्यग्रहण हे खंडग्रास होते. खंडग्रास सूर्यग्रहणात सूर्याचा काही भाग झाकला जातो. विज्ञान जाणीव जागृती वाढल्याने ग्रहणाविषयीचे गैरसमज कमी झाले आहेत. त्यामुळे आजचे सूर्यग्रहण अनेकांनी पाहिले.-चेतना पाटील, खगोल अभ्यासक.