शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात सकाळी सशस्त्र दरोडा, १२ लाखापेक्षा अधीक रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गजबजलेल्या गणपती मंदीरामागील रस्त्यावर असलेल्या डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी तेथील कर्मचाऱ्याला बांधून ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील गजबजलेल्या गणपती मंदीरामागील रस्त्यावर असलेल्या डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी तेथील कर्मचाऱ्याला बांधून ठेवत त्याच्याकडून १२ लाखाची रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याशिवाय डीएसके कॉम्पलेक्समध्येही प्रयत्न झाल्याचे समजते. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
नंदुरबारातील बांधकाम व्यावसायिक व व्यापारी देवेद्र जैन यांचे गणपती मंदीरामागील भागात मुख्य रस्त्यावर डी.सी.डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. या ठिकाणी त्यांचा आर्थिक व्यवहार देखील होतो. ही बाब हेरून दरोडेखोरांनी बुधवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेदरम्यान कार्यालयात घूसून दरोडा टाकला. दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत तेथील कर्मचाºयाला बांधून ठेवले. कार्यालयातील १० ते १२ लाखाची रक्कम घेऊन दोघांनी तेथून पोबारा केला. कर्मचाºयाने कशीबशी सुटका करून आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस आली. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस अधीक्षक महेद्र पंडित , अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, शहर ठाण्याचे सुनील नंदवाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक मागविण्यात आले. पथकाने मागील बाजुच्या रस्त्यापर्यंत माग दाखवून तेथेच घुटमळले.
पोलिसांनी कार्यालयातील तसेच परिसरातील दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.
या शिवाय डीएसके कॉम्पलेक्समध्येही असा प्रयत्न झाला. तेथून किती रक्कम लंपास केली गेली याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.