शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७ बँकांच्या शाखांना मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून जिल्ह्यात १७ बँकांच्या शाखा सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून जिल्ह्यात १७ बँकांच्या शाखा सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यात चार पोस्ट पेमेंट बँका, दोन खाजगी तर ११ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत. खासदार डाॅ. हीना गावीत यांनी यासाठी सतत पाठपुरावा केल्याने या बँकांना मंजूरी मिळाली आहे. दरम्यान नवीन शाखांमुळे दुर्गम भागातील नागरिकांसह ग्रामीण जनतेच्या बँकेबाबतच्या समस्या सुटणार आहे.. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्टेट लेव्हल बँक कमिटीने या १७ बँक शाखा उघडण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्यात सहा हजार खातेधारकांमागे एक बँक आहे. नंदुरबार जिल्ह्यात हे प्रमाण २१ हजार असल्याचे समाेर आले होते. सातपुड्याच्या दुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यात ३५ हजार १२३ तर धडगांव तालुक्यात ६५ हजार खातेदारांची एक बँक शाखा असल्याचे समोर आले हाेते. यातून नागरीकांचे हाल सुरु होते. याकडे लक्ष वेधून खासदार डाॅ. हीना गावीत यांनी पाठपुरावा केल्याने धडगांव, अक्कलकुवा, नवापुर, तळोदा, शहादा, नंदुरबार येथे १६ बँकाच्या शाखा उघडण्यास मंजुरी मिळाली आहे. धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांसाठी सात बँकांच्या तर तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अमोणी येथे एक बँक शाखेस मंजूरी मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. खासदार डाॅ. गावीत यांच्या पाठपुराव्याचे नागरीकांकडून काैतूक करण्यात येत आहे. 

खासदार डाॅ. गावीत यांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील कोठली, शहादा तालुक्यातील कन्साई, कहाटूळ, तोरखेडा येथे पोस्ट पेमेंट बँक, मोहिदे तर्फे शहादा येथे पंजाब नॅशनल बँक, अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथे पंजाब नॅशनल बँक, मक्राणीफळीत कॅनरा बँक, डाब येथे युनियन बँक ऑफ इंडिया, धडगाव तालुक्यातील रोषमाळ येथे युनियन बँक ऑफ इंडिया, गोरंबा येथे पंजाब नॅशनल बँक, घाटली येथे कॅनरा बँक, वडळ्या येथे बँक ऑफ इंडिया, कात्री येथे आयसीआयसीआय बँक, तळोदा तालुक्यातील अमोनी येथे कॅनरा बँक, नवापूर तालुक्यातील नवागाव येथे युनियन बँक ऑफ इंडिया, मोग्राणी येथे बँक ऑफ इंडिया तर हळदाणी येथे ॲक्सिस बँकेचा समावेश आहे.