शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST

यासाठीचे प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेणारा ...

यासाठीचे प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत रहिवासी दाखला, सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्या संबंधित यादीतील अनुक्रमांक नमूद करून दाखल्याची सत्यप्रत, अनाथ अपंग असल्यास त्याबाबतचा दाखला, पालक शासकीय / निमशासकीय सेवेत नसल्याबाबत हमीपत्र, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा बदलता येणार नाही. त्याबाबत हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.

महिला पालक विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला, पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे. सन २०१९ - २० वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत सोबत जोडावी. पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३० सप्टेंबर २०२१ रोजी सहा वर्ष पूर्ण असावे व त्याचा जन्म १ ऑक्टोबर २०१४ ते ३० सप्टेंबर २०१५ या दरम्यान झालेला असावा.

अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवक - नगरपालिका यांचा ऑनलाईन दाखला जोडावा. विद्यार्थ्याच्या आई - वडिलांच्या आधार कार्डची साक्षांकित प्रत, विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थी सन २०२० - २१ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश असल्याबाबतचे बोनाफाईड आदी कागदपत्रेदेखील अर्जासोबत जोडावीत.

सर्व विद्यार्थी व पालकांसाठी अटी, शर्ती व नियम बंधनकारक असून चुकीची माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. १ मार्च २०२१नंतर प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी कळविले आहे.