दलेलपूर शिवारात ८१ हजारांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:50 IST2019-12-10T11:50:39+5:302019-12-10T11:50:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील दलेलपूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका शेतात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना नंदुरबार येथील ...

Ammunition seized in Dalelpur Shivar | दलेलपूर शिवारात ८१ हजारांचा दारूसाठा जप्त

दलेलपूर शिवारात ८१ हजारांचा दारूसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील दलेलपूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका शेतात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून उध्वस्त केला.
याबाबत एका संशयतीला ताब्यात घेण्यात आले आहे. या धाडीत ८१ हजार ३० रुपयांचा माल पकडण्यात आला. असून त्यात बॉम्बे स्पेसल व्हिस्की च्या व ११८ बाटल्या, व यंत्र सामग्री सह व इतर साहित्य सह हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास स्थानिक गन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी करत आहेत.
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्याक फौजदार अनिल गोसावी, हवालदार योगेश सोनवणे, विकास अजगे, जितेंद्र ठाकूर, आंनदा मराठे, अभय राजपूत, या पथकाने सदर कारवाई केली आहे. एका संशयीतास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Ammunition seized in Dalelpur Shivar