आमलाड-बोरद रस्त्याची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:30+5:302021-03-10T04:31:30+5:30

आमलाड ते बोरद रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त ...

Amlad-Borad road repairs started | आमलाड-बोरद रस्त्याची दुरुस्ती सुरू

आमलाड-बोरद रस्त्याची दुरुस्ती सुरू

आमलाड ते बोरद रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त देऊन पाठपुरावा केला होता तसेच याबाबत आमदार राजेश पाडवी यांच्याकडेही परिसरातील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सूचित केले होते. हा रस्ता केंद्र सरकारच्या सीआरएफ योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांपूर्वी १६ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता. रस्त्याची देखभाल व दुरुस्ती ही संबंधित ठेकेदाराला करावी लागते. मात्र, ठेकेदाराने तीन वर्षात पहिल्यांदाच दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

दरम्यान, रस्ता दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तळोदा येथील प्रभारी उपअभियंता सुभाष जगताप यांची परिसरातील वाहनधारकांनी भेट घेतली व दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला सूचना द्यावी, अशी मागणी केली.

Web Title: Amlad-Borad road repairs started