शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 10:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील डी.आर. हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय ते जी.टी. पाटील महाविद्यालयातील २००३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरातील डी.आर. हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय ते जी.टी. पाटील महाविद्यालयातील २००३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा येथे झाला. महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेले मित्र १८ वर्षांनंतर एकत्र आल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले होते.               नंदुरबार शहरातील जी.टी. पाटील महाविद्यालयात २००२-२००३ वर्षी कला विभागातील व डी.आर. हायस्कूलमधील माजी विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळले. डी.आर. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना काही मित्र जी.टी. पाटील महाविद्यालयात व काही महिला कॉलेजला व काही तळोदा येथे एम.एस.डब्ल्यू.साठी गेलेले मित्र तब्बल १८ वर्षांनी व्हॉट्सॲपच्या व फेसबुकच्या माध्यमातून एकत्र झाले. महाविद्यालयात असताना मित्राशिवाय दिवस न जाणारे, दिवसभर मित्रांमध्ये रमणारे मित्र-मैत्रिणी आपापल्या व्यवसायात गुंतल्यामुळे एकमेकांची भेट दुरापास्त झाली. कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आला. या नऊ महिन्यांच्या कालावधीत नातेसंबंधांना उजाळा मिळाला. त्यात मिळालेल्या गत आठवणी आठवत सर्व मित्र फेसबुक, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून एकत्र येत स्नेहमिलन करण्याचे ठरविले. या मित्रांना तब्बल १७ वर्षांनी भेटण्याचा योग जुळून आला. या मेळाव्यासाठी नंदुरबार, शिरपूर, अंबरनाथ, कल्याण, पुणे येथून सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येत गप्पांचा फड जमला. यावेळी भविष्यात एकत्र येत गुरुजनांचा सत्कार करण्याचा मानस करीत सामाजिक कार्य करण्याचा संकल्प घेत एकमेकांचा निरोप घेतला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सूचनांचे पालन करीत स्नेहमेळावा घेण्यात आला.             प्रास्ताविक विजय बडगुजर व नामदेव सूर्यवंशी यांनी केले. यावेळी महेश पाटील, अविनाश पाटील, राकेश सोनवणे, संजय वळवी, श्रीराम बोरसे, विजय बडगुजर, नामदेव सूर्यवंशी, मनोहर पाटील, गणेश तांबोळी, संदीप मोरे, विलास कदमबांडे, हंसराज पाटील, राजकिरण पाटील, राहुल वसावे, रामचंद्र भावसार, बादशाह पिंजारी, ज्योती पवार, दीप्ती पटेल, जयश्री कोळी, श्‍वेता शिंपी, अस्मिता रघुवंशी-सोनवणे, जयश्री कानडे आदी उपस्थित होते.