पिंप्रीपाड्यातील सर्व रुग्ण कोरोनातूून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:30+5:302021-05-10T04:30:30+5:30

नंदुरबार तालुक्यातील पिंप्रीपाडा-भिलाईपाडा ग्रामपंचायत अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील १९४ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात १७ ...

All patients in Pimpri-Chinchwad are free from corona | पिंप्रीपाड्यातील सर्व रुग्ण कोरोनातूून मुक्त

पिंप्रीपाड्यातील सर्व रुग्ण कोरोनातूून मुक्त

नंदुरबार तालुक्यातील पिंप्रीपाडा-भिलाईपाडा ग्रामपंचायत अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील १९४ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात १७ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. त्यांना पिंप्रीपाडा येथील जि. प. शाळेत विलगीकरण कक्ष तयार करून ठेवण्यात आले. त्यांची चहा, नाश्ता व जेवणाची सोय ग्रामपंचायतीने केली. त्यानंतर गावात मुख्याध्यापक संतोष नांद्रे यांनी अहिराणी भाषेतील गीतातून लसीकरणासाठी जनजागृती केली व लसीकरण शिबिर घेण्यात आले. त्यात ६२ व्यक्तींचे लसीकरण झाले. १० दिवसांच्या उपचारानंतर १७ कोरोनाबाधित व्यक्तींना कोणताही त्रास नसल्याने त्यांना कोरोनाचे नियम, काळजी व लसीकरणाचे महत्त्व समजावून आनंदाने घरी सोडण्यात आले. या सर्व कार्यात सरपंच मणिलाल गावित, ग्रामसेवक बी. एस. अहिरे, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील, डॉ. संदीप काकुस्ते, आरोग्य टीम मुख्याध्यापक दिलीप चव्हाण, संतोष नांद्रे, अशोक हेमाडे, अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

Web Title: All patients in Pimpri-Chinchwad are free from corona