शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात हद्दीलगत मिळाले मद्याचे घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : गुजरात राज्यालगत असलेल्या गडद व सागीपाडा या अतिदुर्गम जंगल भागात 18 लाख रुपये किमतीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : गुजरात राज्यालगत असलेल्या गडद व सागीपाडा या अतिदुर्गम जंगल भागात 18 लाख रुपये किमतीचा अवैद्य दारु साठा नवापूर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. गुजरात हद्दीलगत दारूचा अवैध साठा करुन ठेवलेला असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलीसांचे पथक तयार करून  नवापुर हद्दीतील गुजरात राज्यालगत असलेल्या गडद येथील अतिदुर्गम जंगल भागात पोलीसांनी धाड टाकली. भर पावसात नदी, नाले पार करुन जंगलात मुख्य रस्त्यापासुन तीन कि.मी. आडरस्त्याने पायी चालुन शेतातील एका घरात पोलीसांना इम्पेरियल ब्लु कंपनीच्या सात लाख 53 हजार 360 रुपये किमतीचा  मद्यसाठा मिळुन आला. दिलीप शेगजी गावीत, रा. गडद ता. नवापुर असे त्या शेत मालकाचे नाव समोर आले. ही कारवाई सुरु असतांना गुजरात राज्यालगत जंगल परिसरात असलेल्या सागीपाडा भागात इलेश रतिलाल गावीत रा. सागीपाडा याच्या झोपडीतही अवैध दारुचा साठा असल्याची बातमी मिळाल्याने पोलीसांनी तेथे जाऊन घराची तपासणी केली असता तेथेही इम्पेरियल ब्लु कंपनीच्या दहा लाख 88 हजार 640 रुपये किमतीचा मद्यसाठा मिळुन आला. पोलीसांनी दोन्ही ठिकाणचा मिळालेला मद्य साठा जप्त करुन पोलीस ठाण्यात आणून या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले. दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपयर्ंत पोलीसांची कारवाई सुरु होती. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहाय्यक पोलिस निरिक्षक दिगंबर शिंपी, पोलीस उप निरीक्षक शिवाजी नागवे यांच्यासह उपनिरीक्षक कृष्णा पवार, हवालदार गुमानसिंग पाडवी,  दादाभाई वाघ, प्रविण मोरे, योगेश थोरात, शांतीलाल पाटील, महेश पवार, अल्ताफ शेख, आदिनाथ गोसावी, हिरालाल सोनवणे, योगेश्वर तनपुरे, दिलवरसिंग पावरा, मोहन साळवे, हितेश पाटील, योगेश साळवे यांनी ही कारवाई केली.

हा दारु साठा कोणी पुरविला या अनुशंगाने घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल संचाच्या आधारे फोन करुन गुजराती भाषेत पोलीसांनी संभाषण केले.  फोनवरील समोरील इसमास आम्हाला मद्य (माल) पाहीजे असे सांगितल्यावर त्यांनी दारु देण्याचे कबुल केले. पोलीसांनी त्या संबंधितास नंदुरबार येथे बोलावुन घेतले. नवापूर पोलीसांच्या पथकाने तेथे जावुन त्याला ताब्यात घेवुन नवापूर पोलीस ठाण्यात आणुन विचारपुस केली असता त्यांची नावे किशोर पाटील व रवि गिरासे रा. सेंधवा (मध्यप्रदेश) असे असल्याचे समजले. त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून दिलीप शेगजी गावीत, रा. गडद व इलेश रतिलाल गावीत रा. सागीपाडा या दोन्ही  संशयित फरार आरोपींचा शोध सुरु आहे.