शुभकार्याचे अक्षय फळ देणारी ‘अक्षयतृतीया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:34+5:302021-05-10T04:30:34+5:30

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस पाळला जातो. यादिवशी पितरांचे स्मरण करून त्यांचे प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर ...

‘Akshayatruthiya’ which gives inexhaustible fruit of good deeds | शुभकार्याचे अक्षय फळ देणारी ‘अक्षयतृतीया’

शुभकार्याचे अक्षय फळ देणारी ‘अक्षयतृतीया’

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस पाळला जातो. यादिवशी पितरांचे स्मरण करून त्यांचे प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर यादिवशी जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते. नव्या कामाला सुरुवात यादिवशी करतात. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे, सौरऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही अक्षय मानली गेली आहे. विशेषकरून यादिवशी जो गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. यादिवशी विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा केली जाते. त्यांना अर्ध्य दिले जाते. यादिवशी बद्रिनाथ, केदारनाथ यांचे कपाट (द्वारे) खुली केली जातात. अक्षयतृतीयेनिमित्ताने मातीचे माठ किंवा रांझण दान करावे. यादिवशी फळांचा राजा आंबा खाण्यासही सुरुवात होते तसेच अन्नपूर्णा प्रगट दिवस मानतात. यादिवशी सोने खरेदीलाही महत्त्व आहे. महाभारत ग्रंथाची रचनाही याच दिवशी प्रारंभ झाली, अशी अख्यायिका प्रचलित आहे. अशाप्रकारे अक्षयतृतीयेचे हिंदू धर्मात महत्त्व मानले जाते.

।। शुभ भवंतु ।।

Web Title: ‘Akshayatruthiya’ which gives inexhaustible fruit of good deeds