अक्कलकुवा पंचायत समितीतर्फे परिचारिकांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:14+5:302021-05-13T04:31:14+5:30

गटविकास अधिकाऱ्यांनी घातली सर्वांनाच टोपी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी भेटीदरम्यान गावांनाही भेटी देत चला लसीकरण करू या, अशी ...

Akkalkuwa Panchayat Samiti lacks nurses | अक्कलकुवा पंचायत समितीतर्फे परिचारिकांचा गाैरव

अक्कलकुवा पंचायत समितीतर्फे परिचारिकांचा गाैरव

गटविकास अधिकाऱ्यांनी घातली सर्वांनाच टोपी

गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी भेटीदरम्यान गावांनाही भेटी देत चला लसीकरण करू या, अशी घोषवाक्य लिहिलेल्या गांधी टोप्या गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व जबाबदार नागरिकांना वाटप करून प्रोत्साहन दिले. यावेळी लसीकरण कार्याला यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याची शपथ देण्यात आली.

दरम्यान, गटविकास अधिकारी व कर्मचारी यांनी तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत, त्यांना लसीकरणवाढीसाठी नागरिकांना आवाहन करण्याचे सांगितले. अक्कलकुवा शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, तुकाराम वळवी, विनोद वळवी, पंचायत समिती सदस्य जेका पाडवी, रोहित चौधरी, कुवरसिंग वसावे, भाजपचे विश्वास मराठे, कपिल चौधरी, माजी उपसभापती इंद्रपालसिंह राणा, डाबचे सरपंच धनसिंग वसावे, संदीप मराठे, काँग्रेसचे अक्कलकुवा शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, करिम बलोच, डिम्पल चौधरी, भूषण चौधरी, अशोक जैन, दरबारसिंग पाडवी आदींच्या घरी जाऊन लसीकरण वाढीची शपथ देऊन टोपी घालून प्रोत्साहित केले.

Web Title: Akkalkuwa Panchayat Samiti lacks nurses