शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

शेती कामांमुळे मिळतोय मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने हातकामावर जगणाऱ्या मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने हातकामावर जगणाऱ्या मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शेती कामे सुरू झाल्याने ग्रामीण भागातील काही शेतमजुरांना शेणखत भरणे, बाजरी पिकाची कापणी व मळणी करणे, पपई लागवड करणे तसेच पिकांना क्रॉप कव्हर लावण्यात येत असल्याने त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून गेल्या दीड ते दोन महिन्यापासून शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे हातमजुरी, शेतमजुरी करणारे दिवसा काम करून रात्रीची चूल पेटणार या मजुरांवर मोठे संकट ओढावले आहे. हाताला काम मिळत नसल्याने त्यांना दोन वेळचे अन्न शिजवणेदेखील कठीण झाले होते. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी थोडे दिवस संसाराचे गाडे चालेल एवढी मदत केल्यामुळे त्यांना थोडा धीर भेटला. मात्र आता बळीराजा रब्बी नंतर पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यामुळे शेती मशागतीसह सिंचन व्यवस्थेवर ठिंबक पद्धतीने पपई, केळीची लागवडीची कामे सुरू झाली आहेत.
तालुक्यात शेतकरी वर्गाकडून पपई, केळी पिकाची लागवड करण्याचे काम सुरू आहे. रोपांची लागवड केल्यानंतर त्यांची जोराचे वारे, उन्हापासून तसेच कीटक, ससा यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कॉटन स्कार्फ लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे काही मजुरांना रोजगार निर्माण होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.