शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने कृषी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या वतीने दरवर्षी नाशिक येथील डोंगरी वसतिगृह मैदानात जागतिक दर्जाचे ...

दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या वतीने दरवर्षी नाशिक येथील डोंगरी वसतिगृह मैदानात जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन जानेवारी महिन्यात आयोजित केले जाते. परंतु सध्याची कोविड-१९ महामारी पाहता श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाचे प्रणेते आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशान्वये नाशिक येथील कृषी मेळावा रद्द करून तालुका व गावपातळीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व बोरद, ता. तळोदा येथील जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक दोन येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

बोरद येथील कृषी मेळाव्याचे उद्घा‌टन सरपंच वासंतीबाई ठाकरे, प्रगतिशील शेतकरी मिलिंद पाटील, पंचायत समिती सदस्य विजयसिंह राजपूत, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, प्रगतिशील शेतकरी सोमनाथ चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.

या कृषी मेळाव्यामध्ये कृषी विषयक बॅनरच्या स्वरूपात मांडणी करून प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात शेतीला आवश्यक असणारी माहिती व तंत्र बॅनरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नंतर १८ विभागांची माहिती देण्यात आली. यात याज्ञिकी विभाग, मराठी अस्मिता, प्रश्नोत्तर विभाग, विवाह संस्कार, याज्ञिकी, बालसंस्कार, माहिती व तंत्रज्ञान, पर्यावरण प्रकृती विभाग, पशू व गोवंश, गर्भसंस्कार, जनकल्याण व स्वयंरोजगार इत्यादी प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामस्थ व सेवेकऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी महिलांची ओढ मराठी अस्मितेतील १५ स्टॉलकडे जाणवली. त्यातून त्यांनी परंपरागत सण व उत्सव कसे साजरे करावे या संदर्भातील माहिती जाणून घेतली. मेळाव्यासाठी केंद्रातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

वातावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला जैविक शेती आता ही काळाची गरज बनली आहे. निसर्ग चुकला आहे असे बोलले जाते मात्र निसर्ग चुकलेला नाही तर मानव चुकलेला आहे. मानवाने निसर्गावर अन्याय करावा आणि मग आपण त्या निसर्गाकडून परतफेडीची अपेक्षा करावी हे योग्य नाही, असे मत तळोदा पंचायत समिती सदस्य विजयसिंग राजपूत यांनी बोरद येथे पार पडलेल्या कृषी मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले.