शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई करण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 10:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत्या आठ दिवसात कारवाई करण्यात येईल, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत्या आठ दिवसात कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हा पोलीस  अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची शुक्रवारी सांगता झाली.                तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील विकास पिंपळे या युवकाला १९ नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात पोलिसांनी मारहाण केली होती. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पिंपळे कुटुंब बेमुदत उपोषण करीत होते. शुक्रवारी सकाळी आमदार राजेश पाडवी यांनी उपोषणकर्त्यांची  भेट घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी आमदार संपर्क कार्यालयात उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी, पोलीस दलातील अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी यांची आमदार पाडवी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे उपोषणकर्त्यांना कारवाईचे पत्र देण्यात आल्यानंतर उपोषणाची सांगता झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपळे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी नंदुरबार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी करीत असून या चौकशीदरम्यान पो.कॉ.सचिन पाटील व रवींद्र सैंदाणे यांना १७ डिसेंबरपासून नंदुरबार पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उपनिरीक्षक कैलास माळी हे प्रशिक्षणासाठी धुळे येथे उपस्थित आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौकशी अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांवर येत्या  आठ दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लेखी पत्रासोबत लिंबूपाणी देऊन पिंपळे कुटुंबियांच्या उपोषणाची सांगता केली. यावेळी विविध पक्षाचे व संघटनांचे प्रतिनिधी, मोहिदा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषणाची सांगता झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.