शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रियकरा’ला बसताच पब्लिकचा मार ‘प्रेयसी’ झाली पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी निर्जन ठिकाणाचा आसरा घेणे प्रियकर आणि प्रेयसीला चांगलेच महागात पडल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी निर्जन ठिकाणाचा आसरा घेणे प्रियकर आणि प्रेयसीला चांगलेच महागात पडल्याची घटना शुक्रवारी शहरातील बायपास रोडवरच्या उड्डाण पुलाखाली घडली़ यावेळी परिसरातील पब्लिकचा मार बसत असताना प्रेयसी दुचाकी काढून पसार झाल्याने या प्रकारावर पडदा पडला़व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते़ नात्यात असलेले आणि नाते जुळण्यासाठी उत्सुक असलेले प्रेमवीर भावनांना मुक्त करण्यासाठी संधीच्या शोधात होते़ यातून शहरातील विविध भागात सकाळी बऱ्यापैकी गर्दीही दिसून आली़ दरम्यान दुपारी वळणरस्त्यावरील उड्डाणपुलाखालून उमर्दे रस्त्यावर असलेल्या निर्मनुष्यतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न प्रियकर आणि प्रेयसीत सुरु होता़ याच भागातील बंद असलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीलगत दोघे ऐकमेकांना व्हॅलेंटाईच्या शुभेच्छा देत भावना व्यक्त असताना काहींची नजर त्यांच्यावर पडली़ यातून गलका वाढत जाऊन गर्दी गोळा झाली़ दोघांची विचारपूस केल्यावर एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती दिली़ चौकशी वाढून प्रियकर अरेरावी करत असतानाच एकदोघांनी त्याच्यावर हात उचलत सार्वजनिक जागेवर चुकीचे काम करत असल्याचे सांगून बदडण्यास सुरुवात केली़ पब्लिकचा संताप लक्षात आल्यानंतर त्या प्रेयसीने थेट दुचाकी स्टार्ट करुन घराकडे जाणे पसंत केले़ या प्रकारानंतर प्रियकरही तेथून सटकल्याची माहिती आहे़दुपारी तब्बल एक तास सुरु असलेल्या प्रकारामुळे उड्डाणपुलावरुन धुळे चौफुलीकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती़ बघ्यांची गर्दी झाल्याने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्या ठिकाणी भेट गर्दी आटोक्यात आणल्याची माहिती आहे़दरम्यान याठिकाणी आढळून आलेली युवती ही अल्पवयीन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़ दोघांनाही समज देत असताना युवकाने विरोध केल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे़