पीर तलाव दहा वर्षानंतर भरला काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:22 PM2019-09-22T12:22:44+5:302019-09-22T12:22:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : क्रिडा संकुलाला लागून आणि शासकीय अधिका:यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस असलेला पीर तलाव यंदा काठोकाठ ...

After 10 years, Pir Lake was filled to the brim | पीर तलाव दहा वर्षानंतर भरला काठोकाठ

पीर तलाव दहा वर्षानंतर भरला काठोकाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : क्रिडा संकुलाला लागून आणि शासकीय अधिका:यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस असलेला पीर तलाव यंदा काठोकाठ भरला आहे. तलावाला सांडवा नसल्यामुळे तलावातील पाणी शासकीय निवासस्थाने, क्रिडा संकुलाचा रस्ता या भागातून वाहू लागले आहे. आणखी पाण्याची आवक झाल्यास तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलावाचा विसर्ग तयार करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, 2007 साली तलाव फुटून मोठे नुकसान झाले होते. 
नंदुरबारचा पीर तलाव प्रसिद्ध आहे. या तलावाला पूर्वी मोठय़ा प्रमाणावर पाणी राहत होते. परंतु जिल्हा निर्मितीनंतर तलावाच्या आजूबाजू शासकीय अधिका:यांचे निवासस्थाने, जिल्हा क्रीडा संकुल आणि इतर इमारती आल्याने या तलावात येणा:या पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे गेल्या 20 वर्षात हा तलाव केवळ दोन वेळा भरला. 2007 साली आणि यंदा हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. पूर्वी तलावातील पाण्याचा विसर्ग होण्यासाठी जागा होती. परंतु पालिकेने तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तलावाच्या चारही बाजुंनी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा विसर्गच बंद झाला आहे. परिणामी यंदा अतिवृष्टी आणि जास्तीचा झालेला पाऊस यामुळे तलाव तुडूंब भरला आहे. 
परिणामी परिसरातील जिल्हा शल्य चिकित्सकांचे निवासस्थानची भिंत, लगतची वसाहत आणि क्रिडा संकुलाकडे जाणा:या रस्त्यांर्पयत पाणी आले आहे. तलावात आणखी पाण्याची आवक झाल्यास तलाव कधीही आणि कुठूनही फुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
परिसरासाठी वरदान
पीर तलाव पूर्वी परिसरासाठी वरदान होता. कुठलेही बांधकाम नसल्यामुळे तलाव भरून त्याच्या पाण्याचे पक्यरूलेशन अनेक किलोमिटर्पयत होत असल्याने परिसरातील शेतक:यांना ते फायद्याचे ठरत होते. परंतु आजूबाजू बांधकाम झाल्याने या तलावात पाणी येणेच बंद झाले आहे. नैसर्गिक जीवसृष्टीसाठी देखील हा तलाव उपयोगी  होता. नेक प्रकारचे पक्षी या ठिकाणी पूर्वी दृष्टीस पडत होते. परंतु सध्या या परिसरात मोठय़ा प्रमाणावर बांधकाम झाल्याने आणि तलावात पाणी देखील राहत नसल्याने पक्षी येणेच या ठिकाणी बंद झाल्याचे दिसून येत आहे. 
दोन ठिकाणाहून आवक
या तलावात पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या बाजूने जाणारा नाला आणि क्रिडा संकुलाकडून येणारा नाला या दोन नाल्यातून पाण्याची आवक होते. यंदा या दोन्ही नाल्यांना जुलै महिन्यापासूनच मोठय़ा प्रमाणावर पाणी असल्याने तलाव तुडूंब भरला आहे. 

पालिकेकडून होणारे सौंदर्यीकरण रखडले..
पालिकेने दहा वर्षापूर्वी पीर तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे ठरविले होते. त्यासाठी एक कोटींचा निधी देखील प्रस्तावीत करण्यात आला होता. या निधीतून तलावाच्या आजूबाजू संरक्षक भिंत देखील बांधण्यात आली आहे. परंतु नंतर या तलावाच्या सुशोभिकरणाचे काम रखडले. नंतर पालिकेने हे कामच रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या तलावाकडे कुणीही लक्ष दिले नाही. 

एकदा फुटला होता तलाव.. 
2006-07 साली देखील पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यावेळी देखील हा तलाव तुडूंब भरला होता. त्यावेळी देखील पाण्याचा विसर्ग न झाल्याने तलाव फुटला होता. त्यामुळे या भागातील शेड, गोडावून यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी ज्या भागातून तलाव फुटला होता त्या भागात आता वसाहत आहे. कच्च्या झोपडय़ा बांधून नागरिक राहू लागले आहे. त्या भागात पुन्हा काही अपरित घडले तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता तलावासाठी विसर्गाची सोय करून देणे आवश्यक आहे. 
कुणाच्या अख्त्यारीत तलाव..
हा तलाव पालिकेच्या हद्दीत असला तरी  या तलावाची मालकी जिल्हा परिषदेची की पालिकेची असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळेच या तलावाकडे कुणाचेही लक्ष नसल्याची स्थिती आहे. या तलावाच्या बाजुलाच असलेल्या जिल्हा  क्रिडा संकुलामुळे हा तलाव सध्या चर्चेत आहे. 
 

Web Title: After 10 years, Pir Lake was filled to the brim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.