शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

खापर येथे प्रती सिलिंडरला २८ रुपयांची जास्तीची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST

अक्कलकुवा तालुक्यात गॅस एजन्सी ग्राहकांना सिलिंडर सेवा देत असून सध्या गॅसचे प्रती सिलिंडर दर ७८२ रुपये घरपोच असताना खापर ...

अक्कलकुवा तालुक्यात गॅस एजन्सी ग्राहकांना सिलिंडर सेवा देत असून सध्या गॅसचे प्रती सिलिंडर दर ७८२ रुपये घरपोच असताना खापर गावात सिलिंडर धारकांकडून ८१० रुपये दराप्रमाणे आकारणी केली जात आहे. या प्रकाराविषयी संबंधितांना विचारणा केली असता, घरपोच सिलिंडर पोहोचविण्यासाठी जादा आकारणी करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गॅस खरेदी पावतीवर ७८२ रुपयांची नोंद केली जात असताना अतिरिक्त वसुली करण्यात येत आहे.

खापर गावासह परिसरातील दररोज शेकडो सिलिंडर वितरित करण्यात येत असून त्यातील बहुतेक सिलिंडर जवळील गुजरात राज्यात विक्री केली जात आहे. या विक्रीतून सिलिंडर विक्रेत्याला प्रती सिलिंडर जादा पैसे मिळत असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे.

खापर परिसरातील अनेक गावे गुजरात राज्य सीमेलगत असून त्यांना डेडीयापाडा येथून सिलिंडर ने-आण करणे गैरसोयीचे ठरत असल्याने बहुतेक ग्राहक घरपोच सिलिंडर घेताना दिसून येत आहेत.

सदर एजन्सी चालक सिलिंडरचे वजन करून देत नसून, सिलिंडरची पोहोच पावतीही देत नसल्याचे ग्राहकांना आढळून आले आहे. त्यामुळे यातील गौडबंगाल कळत नसल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. अनेक ग्राहक ऑनलाइन पेमेंटचा वापर करीत असताना सदर कर्मचारी ऑनलाइन पेमेंट स्वीकारत नसून रोखीनेच पेमेंटचा आग्रह करण्यात येत असल्याने वाद उद्भवत आहेत. सध्या गोडाऊन डिलिव्हरीचे भाव काय आहेत हे ग्राहकांना कळविणे आवश्यक असून एजन्सी चालकांकडून माहिती फलक लावण्यात आला नसून ग्राहकाकडून माहिती फलकांची मागणी करण्यात येत आहे.

तालुक्यातील पुरवठा विभागाकडून या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सामान्य जनतेसाठी असताना तालुक्यातील बहुसंख्य हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडर सर्रास वापरले जात आहेत. या अवैध वापरावर कार्यवाही होतांना दिसून येत नाही. तसेच खासगी वाहनांमध्ये गॅसचा खुलेआम वापर करण्यात येत आहे. एजन्सी धारकाकडून अवैध व्यवसायाला पाठबळ मिळत असून पुरवठा खात्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

जिल्हाभरात घरपोहोच सिलिंडरचे दर एकसारखे असताना अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे २८ रुपये जास्तीचा दर आकारला जात आहेत. याची पुरवठा खात्याने चौकशी करावी व घरपोहोच सिलिंडर कार्डावर नोंदविण्यात आलेल्या दरात देण्यात यावेत यावेत अशी मागणी खापर येथील त्रस्त गॅसधारकाकडून करण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा शाखेने याची दखल घेऊन जनतेला दिलासा देण्याची मागणी होत आहे.