रेशनचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:38 IST2020-09-23T12:36:04+5:302020-09-23T12:38:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासकीय गोदामातून लाभार्थींना वाटप करण्यासाठी घेतलेले स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जाणाऱ्या दुकानदारावर ...

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासकीय गोदामातून लाभार्थींना वाटप करण्यासाठी घेतलेले स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जाणाऱ्या दुकानदारावर पुरवठा विभागाने कारवाई केली़ याप्रकरणी रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आत्र्या पाच्या वळवी रा़ चिखली ता़ नवापूर असे स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे़ रविवारी आत्र्या वळवी याने चिखली गावातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करता यावे यासाठी नवापूर येथील शासकीय गोदामातून ५१ हजार ६०० रूपये किमतीचे आठ क्विंटल गहू उचल केली होती़ हा गहू जीजे १९ यू २०९७ या रिक्षाने घेऊन गेला होता़ चिखली ग्रामस्थांना दुकानदार आत्र्या वळवी हा चिंचपाडा ते खर्जे गावाच्या रस्त्यावर दुकानात गहू उतरवत असल्याचे दिसून आले होते़ त्यांनी त्यास हटकल्यानंतर दुकानदाराने पुन्हा गहू रिक्षात टाकून पळ काढला होता़ ग्रामस्थांनी ही माहिती पुरवठा विभागाला दिल्यानंतर त्याला रस्त्यात थांबवून विचारणा करण्यात आली़ याप्रकारानंतर पुरवठा विभागाने चौकशी करत सोमवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली़ याबाबत रविंद्र कानडे यांच्या फिर्यादीवरून दुकानदार आत्र्या पाच्या वळवी, भैरूशेठ अग्रवाल रा़ चिंचपाडा व दिलीप केला पाडवी रा़ अंजणे अशा तिघांविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत करत आहेत़
रेशनदुकानदारासह दोघांविरूद्ध भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़ नवापूरात प्रथमच एखाद्यावर या कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत़