शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क प्रकरणी दोन दिवसात ५० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST

नंदुरबार : विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात जिल्ह्यात कारवाईचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात जवळपास ५० जणांवर कारवाई करण्यात आली असून, ...

नंदुरबार : विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात जिल्ह्यात कारवाईचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात जवळपास ५० जणांवर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांतर्फे बसस्थानक, रेल्वे स्थानकासह बाजाराच्या परिसरात मास्क वापरण्याविषयी जनजागृतीही केली जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे. पोलिसांतर्फे कारवाईसह दंडाची आकारणी केली जात आहे. याशिवाय मंगल कार्यालये, सामाजिक सभागृहे याठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने लादण्यात आली आहेत.

गेल्या दोन दिवसात अर्थात मंगळवारी व बुधवारी पोलिसांनी जिल्हाभरात ५० जणांवर कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पहिल्यावेळी २०० रुपये, दुसऱ्यावेळी ४०० रुपये तसेच तिसऱ्यावेळी तीच चूक झाल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे मात्र नागरिकांना मास्क लावण्याची सवय लागल्याचेही चित्र आहे.