शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सिल्लोड येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथे २००२ मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले़ या आरोपीचा शोधात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा येथे २००२ मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले़ या आरोपीचा शोधात पथक उत्तरांचल राज्यात जाऊन आल्यानंतरही तो मिळून आला नव्हता़२००२ मध्ये शहादा-दोंडाईचा रोडवरील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या रामदास शामा धाडगे यांचा खून झाला होता़ याप्रकरणी पोलीसांनी मनोरंजन कमलचंद मंडल, चिंग्यांगो महेश विधकमी, मुकेश मोतीलाल ठाकूर, प्रकाशसिंग माधवसिंग गडीया, हरीचंद्र नैनसिंग जेठवा यांना अटक करुन न्यायालयीन कामकाज केले होते़ दरम्यान न्यायालयाने प्रकाशसिंग गडीया यास जन्मठेपेची तर इतर चौघांना निर्दोष सोडले होते़ शिक्षेविरोधात प्रकाशसिंग याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ यातून शिक्षेला स्थगिती मिळाली होती़ तेव्हापासून प्रकाशसिंग हा फरार होता़ दरम्यान न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याचा निकाल दिला होता़ यामुळे एलसीबीचे पथक त्याचा शोध घेत होते़ तो उत्तरांचलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे भेट दिली होती़ परंतू याठिकाणी तो मिळून आला नव्हता़ दरम्याम प्रकाशसिंग हा सिल्लोड येथील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २३ डिसेंबर रोजी रात्री ताब्यात घेण्यात आले़ पथकाने उत्तरांचलमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीचा सामना करत संशयिताचा शोध घेणे सुरु ठेवल्याने पोलीस अधीक्षक पंडीत यांना त्यांचा गौरव केला़ ही कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, दिपक गोरे, योगेश सोनवणे, मोहन ढमढेरे, विजय ढिवरे यांनी केली़