शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने घेतलेल्या अंदाजात जिल्ह्यातील शिवार झाले मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा झालेल्या पावसामुळे शेतशिवारातील पिके मजबूत झाली असून यातून 100 टक्के उत्पादन येण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा झालेल्या पावसामुळे शेतशिवारातील पिके मजबूत झाली असून यातून 100 टक्के उत्पादन येण्याचा अंदाज असल्याने सर्व 857 खरीप गावांची पैसेवारी ही 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचे जाहिर करण्यात आले आह़े प्रशासनाकडून सोमवारी नजर पैसेवारी जाहिर करण्यात आली आह़े     जिल्ह्यात आतार्पयत सरासरीच्या 108 टक्के पाऊस कोसळला आह़े या पावसामुळे पेरणी झालेल्या दोन लाख 88 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची स्थिती मजबूत झाली होती़ या पिकांचा अंदाज घेत महसूल प्रशासनाने गावनिहाय पैसेवारी जाहिर केली आह़े यानुसार जिल्ह्यातील 857 खरीप आणि 30 खरीप गावांमधील स्थिती चांगली असल्याचे दिसून आल्यानंतर या गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े यातील काही गावांची स्थिती मजबूत असून त्यांची पैसेवारी 70 पैश्यांर्पयत गेल्याची माहिती देण्यात आली आह़े प्रशासनाचा हा प्राथमिक अंदाज असला तरी गेल्या तीन वर्षानंतर शेतीक्षेत्रासाठी हा दिलासादायक असाच अंदाज आह़े गेल्यावर्षी चार तालुके भीषण दुष्काळग्रस्त तर दोन तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती होती़ परंतू यंदा पावसाने उशिरा का, होईना लावलेल्या हजेरीमुळे दुष्काळचक्र खंडीत झाले आह़े 

जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून प्राप्त अहवालानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सोमवारी जिल्ह्याची 2019-20 या वर्षाची प्राथमिक नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 155 गावांपैकी 145 खरीप आणि 10 रब्बी गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े नवापूर तालुक्यातील सर्व 165 खरीप गावांची स्थिती मजबूत असल्याचा अंदाज असून सर्व गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े तळोदा तालुक्यातील सर्व 94 खरीप गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आह़े शहादा तालुक्यातील 160 खरीप आणि 20 रब्बी गावांची स्थिती मजबूत असल्याची माहिती देण्यात आली आह़े या गावांची पैसेवारी ही 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े शहादा तालुक्यातील तापी काठासह उत्तर भागातील गावांमध्ये पिकांची स्थिती चांगली आह़े  सातपुडय़ाच्या दुर्गम भागात अक्कलकुवा तालुक्यातील सर्व 194 तर धडगाव तालुक्यातील सर्व 99 खरीप गावांची पैसेवारीही यंदा 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज महसूल विभागाने वर्तवला आह़े 

येत्या तीन महिन्यानंतर अंतिम आकडेवारी जाहिर होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े तोवर पिकांची स्थिती आणखी मजबूत होणार असल्याने पैसेवारी स्थिर राहणार आह़े  महसूल विभागाने घेतलेल्या नजर पैसेवारीत 30 रब्बी गावांचीही स्थिती तपासून तेथील पैसेवारी जाहिर केली आह़े जिल्ह्यात यंदा 106 टक्के पेरण्या झाल्या आह़े तब्बल 2 लाख 88 हजार 804 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत़ सरासरीच्या सहा टक्के अधिक पेरणी क्षेत्र हे पावसामुळे वाढल्याचे सांगण्यात आले आह़े कापूस आणि सोयाबीनसह इतर खरीप पिकांना पावसाचा लाभ मिळाल्याने शेतशिवारातील त्यांची स्थिती मजबूत आह़े सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे कीड रोग तसेच इतर कीडीचे आजार पिकांवर यंदा फोफावू शकलेले नसल्याने पिकांची स्थिती दोन महिन्यानंतरही चांगली आह़े