जामिया कोविड सेंटरमधील ८० वर्षीय वृद्ध महिलेची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:23+5:302021-05-21T04:31:23+5:30

जामिया इस्लामीया इशातुल उलमु संचलित मेडिकल कॉलेजच्या अस-सलाम हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरमध्ये कौलीगव्हाण येथील ८० वर्षीय फोताबाई ...

An 80-year-old woman from Jamia Kovid Center defeated Corona | जामिया कोविड सेंटरमधील ८० वर्षीय वृद्ध महिलेची कोरोनावर मात

जामिया कोविड सेंटरमधील ८० वर्षीय वृद्ध महिलेची कोरोनावर मात

जामिया इस्लामीया इशातुल उलमु संचलित मेडिकल कॉलेजच्या अस-सलाम हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरमध्ये कौलीगव्हाण येथील ८० वर्षीय फोताबाई पाडवी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दाखल करण्यात आले होते. याठिकाणी दाखल होत असताना त्यांची ऑक्सिजन लेवल ८८, तर एचसीटीआरचा स्कोर हा १३ होता. अशा परिस्थितीत अस-सलाम हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर डाॅ. आरिफ शेख, डाॅ. मल्हान आणि डाॅ. असद पटेल यांनी पाच दिवस उपचार केले. या दरम्यान, फोताबाई यांनी आत्मविश्वास ढळू न देता, सकारात्मक राहून उपचार घेतले होते. यातून त्या कोरोनामुक्त झाल्या. रुग्णालयाचे व्यवस्थापक सुलेमान रेंदेय, उवेश रेंदेय, शेख अखलाक यांनी वृद्ध महिलेला पुष्पगुच्छ देऊन घरी सुखरूप पोहोचविले.

जामियाच्या कोविड केअर सेंटरमध्ये ८ ऑक्सिजन बेड, दोन आयसीयू आणि २० आयसोलेशन बेड असून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी रुग्णांना सेवा देत असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: An 80-year-old woman from Jamia Kovid Center defeated Corona