मंगळ बाजारातील ७७ वर्षीय महिला कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:55 IST2020-07-01T11:55:24+5:302020-07-01T11:55:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ७७ वर्षीय महिला व ५६ वर्षीय पुरुष कोरोनामुक्त झाले आहेत़ जिल्हा रुग्णालयाने अधिकृतरित्या ...

A 77-year-old woman from Mars Bazaar is free from corona | मंगळ बाजारातील ७७ वर्षीय महिला कोरोनामुक्त

मंगळ बाजारातील ७७ वर्षीय महिला कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील ७७ वर्षीय महिला व ५६ वर्षीय पुरुष कोरोनामुक्त झाले आहेत़ जिल्हा रुग्णालयाने अधिकृतरित्या ही माहिती दिली असून दोघांना घरी सोडण्यात आले आहे़ दोघांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील संसर्गमुक्त नागरिकांची संख्या ही ७४ झाली आहे़
कोरोनामुक्त झालेली ७७ वर्षीय वृद्ध महिला ही मंगळबाजार परिसरातील रहिवासी आहे़ महिलेच्या कुटूंबासह संपर्कात आलेल्या १० जणांना कोरोनाची बाधा झाली होती़ एकाच दिवस मोठ्या संख्येने रुग्ण गेल्या आठवड्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती़ दरम्यान त्याच साखळीतील ७७ वर्षीय महिला बरी झाल्याने इतर बाधित आणि संपर्कात आलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे़ महिलेसोबत गिरीविहार परिसरातील ५६ वर्षीय पुरुषालाही घरी सोडण्यात आले आहे़ पुरुषाचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे़ संबधित पुरुष हा व्यावसायिक असून त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले आहे़ दोघे कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालय व जिल्हा प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहे़

Web Title: A 77-year-old woman from Mars Bazaar is free from corona