आरटीईअंतर्गत शाळांचे ७१ लाखांचे अनुदान थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:34+5:302021-05-29T04:23:34+5:30

नंदुरबार : आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशाचे गेल्या शैक्षणिक वर्षाचे तब्बल ७१ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान थकले आहे. मार्च ...

71 lakh grant for schools under RTE | आरटीईअंतर्गत शाळांचे ७१ लाखांचे अनुदान थकले

आरटीईअंतर्गत शाळांचे ७१ लाखांचे अनुदान थकले

नंदुरबार : आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशाचे गेल्या शैक्षणिक वर्षाचे तब्बल ७१ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान थकले आहे. मार्च अखेर केवळ सहा लाख तीन हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यान्वये अनुदानासाठी ४६शाळा पात्र आहेत. तर पात्र नसलेल्या शाळांची संख्या २१ आहे. जिल्ह्यातील ४६ शाळांना गेल्या शैक्षणिक वर्षात अर्थात २०१९-२० मध्ये अनुदान प्रतिपुर्तीची ७१ लाख ६४ हजार १९८ रुपयांची रक्कम थकीत आहे. यंदा मार्च २०२१ मध्ये सहा लाख तीन हजार रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे.

दरवर्षी राज्य स्तरावरून जिल्हास्तरावर अनुदान प्राप्त होते. त्यानंतर प्राप्त अनुदान कोषागारातून आहरीत करून जिल्ह्यास्तरावर प्राप्त असलेल्या प्रस्तावांची छाननी करून परिपुर्ण प्रस्ताव असलेल्या शाळांना अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.

कोट...

अनुदानासाठी पात्र शाळांना त्यांच्या प्रस्तावाच्या प्रतिपुर्तीची रक्कम मिळावी यासाठी शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनुदान प्राप्त होताच ते शाळांच्या बॅंक खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे.

-डॅा.युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी, नंदुरबार.

Web Title: 71 lakh grant for schools under RTE