शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

वेरी येथील शिबिरात ७०६ जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

वेरीच्या आमलीपाडा येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात मोठा मंडप टाकून शिबिरार्थींची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराचे उद्‌घाटन सरपंच इमाबाई भरतसिंग ...

वेरीच्या आमलीपाडा येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात मोठा मंडप टाकून शिबिरार्थींची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराचे उद्‌घाटन सरपंच इमाबाई भरतसिंग तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी नरोत्तम बिऱ्हाडे, केंद्रप्रमुख बकाराम गावित, मुख्य सेविका सरला वळवी, भरतसिंग आरशी तडवी, सुकलाल महाराज, धीरसिंग वसावे, ग्रा.पं. सदस्य सोन्या तेजला वसावे, रामसिंग वसावे आदींची उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे यांच्या देखरेखीखाली जालमसिंग वसावे, आरोग्य सेवक राजेंद्र डोलार, मुक्ता पाडवी, अरुणा किराडे, व्ही.बी. पाडवी, एस.बी. तडवी, के.जे. वळवी व एस.एम. वळवी यांनी शिबिरार्थींना लस दिली. शिबिरासाठी युनिसेफचे जिल्हा समन्वयक जितेंद्र वळवी यांच्यासोबत त्यांचे सहकारी रवींद्र वळवी, जयसिंग वसावे, प्रदीप पाडवी यांनी लोकांना समुपदेशन करून लसीकरणास प्रवृत्त केले. केंद्रप्रमुख गावित यांनी गेल्या आठ दिवसांपासून काठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी पाड्यापाड्यांवर फिरून लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन सर्वांची नोंदणी करून घेतली होती. ग्रामपंचायतीकडून शिबिरार्थींच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरणस्थळी येण्यासाठी महिला व पुरुषांना स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराला जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी व गटशिक्षणाधिकारी रमेश देसले यांनी भेट देऊन शिक्षक व आशा सेविकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. लसीकरणासाठी युनिसेफचे जितेंद्र वळवी व त्यांचे सर्व सहकारी, प्रा.आ. केंद्र काठीचे डॉ. कुलदीप ठाकरे व त्यांचे सर्व सहकारी, काठी केंद्रातील जि.प. शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी मालसिंग वसावे व आशासेविकांचे सहकार्य लाभले.