शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

जिल्ह्यातील ५८ आरोग्य केंद्रेही सुरक्षेच्या दृष्टीने रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९० उपकेंद्रांमध्ये फायर व इलेक्ट्रीक ॲाडीट संदर्भात सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९० उपकेंद्रांमध्ये फायर व इलेक्ट्रीक ॲाडीट संदर्भात सर्वच आलबेल असल्याचे चित्र आहे. काही इमारती जिर्ण झाल्या आहेत तर काही ठिकाणी नव्या इमारती असल्या तरी त्यांच्या देखभाल दुरूस्तीअभावी त्यांचीही अवस्था खराब आहे. अशा वेळी रुग्णांच्या जिवाशी खेळ होण्याचाच हा प्रकार असल्याचे चित्र आहे.                जिल्ह्यातील निम्मे आरोग्य केंद्रांच्या इमारतींची अवस्था वाईट आहे. त्यामुळे त्यातील इलेक्ट्रीक फिटींग आणि अग्नीरोधक यंत्रे तर नावालाच आहेत. अशा वेळी रुग्णांना जीव मुठीत घेऊनच अशा ठिकाणी उपचारासाठी थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. आरोग्य केंद्रांची देखभाल आणि दुरूस्तीबाबत देखील फारशी समाधानकारक अवस्था नाही. जुन्या इमारती असलेल्या ठिकाणी इलेक्ट्रीक फिटींगची अवस्था वाईट आहे. अनेक ठिकाणी वायरी लोंबकळणे, बटणांचा बॅाक्स तुटलेला असणे यासह इतर अनेक समस्या दिसून येत आहेत. त्यामुळे शॅार्ट सक्रीटचा धोकाही निर्माण होऊ शकतो. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने अशा ठिकाणांचा सर्वे करून दुरूस्तीसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.         अशीच स्थिती अग्नीरोधक उपकरणांची आहे. अवघ्या  सात ते आठ आरोग्य केंद्रांमध्येच सुस्थितीतील आणि मुदत असलेले अग्नीरोधक उपकरणे आहेत. काही ठिकाणी असले तरी त्याच्या वापराबाबत कुणालाही कल्पना नाही. त्यामुळे त्यांचा असून उपयोग काय? असा प्रश्न निर्माण होतो. दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये तर वीज पुरवठ्याची समस्या असते. २० उपकेंद्रांच्या इमारती तर भाड्याच्या घरात चालतात. त्यामुळे आरोग्याची विचित्र अवस्था अशा भागात आहे. 

तालुकानिहाय आरोग्य केंद्र

नंदुरबार   ०७  शहादा  १२  नवापूर  ०९   तळोदा  ०४   अ.कुवा  १३   धडगाव   १३

जिल्ह्यातील २० उपकेंद्र चालतात भाड्याच्या घरातजिल्ह्यातील २० उपकेंद्रांना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे ते कुडाच्या घरात किंवा साध्या घरात चालविल्या जातात. त्यात नंदुरबार तालुक्यात एक, नवापूर तालुक्यात तीन, शहादा तालुक्यात एक, अक्कलकुवा तालुक्यात नऊ तर धडगाव तालुक्यात सहा उपकेंद्रांचा समावेश आहे. अशा केंद्रांना स्वत:च्या इमारती बांधकामासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी विविध योजनेतून निधी मिळविण्यात येत आहेत. 

जिल्ह्यात ५८ आरोग्य केंद्राअंतर्गत एकुण २९० उपकेंद्र आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात ४३, नवापूर ४६, शहादा तालुक्यात ६३, अ.कुवा तालुक्यात ६१, तळोदा २७ व धडगाव तालुक्यात ५० उपकेंद्र आहेत.