५५ कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:30 IST2019-12-23T12:30:34+5:302019-12-23T12:30:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवारी झाले. पहिल्या प्रशिक्षणातच ५५ कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना ...

५५ Absent for employee training | ५५ कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर

५५ कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवारी झाले. पहिल्या प्रशिक्षणातच ५५ कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.
संजय टाऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण झाले. निवडणूक निर्णय अधिकारी वसुमना पंत, सहायक अधिकारी बाळासाहेब थोरात यांनी कर्मचाºयांना प्रशिक्षण दिेले. तालुक्यातील दहा गट व २० गणांसाठी २२४ मतदान केंद्र असून त्यासाठी १२०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाºयांचे पहिले प्रशिक्षण रविवारी घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात ६०० व दुसºया टप्प्यात ६०० कर्मचाºयांना पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणास ३० तर दुसºया टप्प्प्यातील प्रशिक्षणास २५ असे एकुण ५५ कर्मचारी गैरहजर होते. ैगैरहजर कर्मचाºयांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: ५५ Absent for employee training