४५ वनजमीनधारकांना जमिनीचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 13:24 IST2020-10-15T13:24:03+5:302020-10-15T13:24:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी ४५ वनअतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीच्या ताबा पावत्या येथील महसूल प्रशासनाकडून देण्यात ...

४५ वनजमीनधारकांना जमिनीचा ताबा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी ४५ वनअतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीच्या ताबा पावत्या येथील महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्या. याप्रसंगी गेल्या ४० वर्षाच्या लढ्यानंतर प्रत्यक्ष जमिनींचे कागदपत्र मिळाल्याने या वनपट्टेधारकांनी आनंद व्यक्त केला होता. दरम्यान जे प्रलंबीत दावे आहेत त्यावरही तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा वनजमीन अतिक्रमणधारकांनी केली आहे. जिल्ह्यातील दाव्यांपैकी अजूनही २६ हजार दावे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
येथील महूसल प्रशासना व पिंपरपाडा वनसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी संबंधितांचे वनजमिनींचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते डाॅ.कांतीलाल टाटीया, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, उपविभागीय वनसमितीचे सदस्य दाज्या पावरा, पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, छगन कोठारी, यशवंत पाडवी, सरपंच वासुदेव वळवी, माजी सरपंच नारायण ठाकरे, नायब तहसीलदार बी.व्ही. अहिरराव, मंडळ अधिकारी एस.एम. पाडवी, सुरेश भांगा पाडवी, वीरसिंग पाडवी, नारायण बागले, वासुदेव नाईक, गुड्डू वळवी, तलाठी एस.वाय. जठारे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते परिसरातील ४५ वनजमीन अतिक्रमणधारकांना आपल्या जमिनीचा मालकी हक्क देण्यात आल्याने ते भारावले होते. या वेळी आमदार पाडवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अतिक्रमणधारकांनी ते दावे प्रशासनाने दाखल केले आहे. त्याबाबतची कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करावी. जेणे करून त्यात कुठल्याही प्रकारची त्रुटीराहणार नाही. ज्या-ज्या ठिकाणी वनदाव्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांची संपूर्ण माहिती मी घेतली आहे. साधारण ७६० हेक्टर जमीन महसुली झाली आहे. यावरील पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभाग व उपमुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून प्रत्यक्ष शिष्ट मंडळच नेणार आहे, असे सांगून माझ्या राहिलेल्या कालावधीत शहादा-तळोदा तालुक्यातील संपूर्ण वनजमीन अतिक्रमणधारकांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डाॅ.कांतीलाल टाटीया, नागेश पाडवी, यशवंत पाडवी, दाज्या पावरा यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पिंपरपाडा वनसमितीचे अध्यक्ष कांतीलाल पाडवी यांनी केले. सूत्रसंचालन कांतीलाल वळवी तर आभार लक्ष्मण पाडवी यांनी मानले.