शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

४०० शिक्षकांना द्यावी लागेल आणखी वर्षभर अवघड भागात सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा जिल्हाअंतर्गत आॅनलाईन आणि आॅफलाईन देखील बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्गम डोंगराळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा जिल्हाअंतर्गत आॅनलाईन आणि आॅफलाईन देखील बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्गम डोंगराळ भागातून सपाटीवरील भागात येणाऱ्या जवळपास ४०० पेक्षा अधीक शिक्षकांना आणखी वर्षभर दुर्गम भागात राहावे लागणार आहे. यात शिक्षिकांची देखील मोठी संख्या आहे.
कोरोनामुळे यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरावरून होणाºया आॅनलाईन बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा आॅनलाईन बदल्यांमध्ये काही बदलही केले जाणार होते. परंतु शासनाने आॅनलाईन बदल्याच रद्द केल्याने प्रस्तावीत बदलही झाले नाहीत. त्यानंतर शासनाने पुन्हा आदेश काढून शिक्षकांच्या आॅफलाईन बदल्या स्थानिक स्तरावरच १५ टक्केच्या मर्यादेत कराव्या असे आदेश काढले. प्रशासकीय आणि विनंती बदल्यांबाबत हे आदेश होते. त्यासाठी सेवा ज्येष्ठता यादी, त्यावरील हरकती आणि इतर सर्व बाबींची प्रक्रीया केली गेली. परंतु शासनाने ऐनवेळी प्रशासकीय बदल्या करू नये केवळ विनंती बदल्या कराव्या असे आदेश काढले. त्यानंतर विनंती बदल्यांबाबतचीही प्रक्रिया राबविली गेली. परंतु ऐनवेळी स्थानिक स्तरावर निर्णय होऊन विनंती बदल्याही यंदा रद्द करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जाहिर केले.
या सर्व गोंधळात बदलीपात्र शिक्षक मात्र नेहमीच संभ्रमात राहिले. आता विनंती बदल्याही रद्द करण्यात आल्याने बदलीपात्र शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
यंदा दुर्गम भागातील ४०० शिक्षक बदलीपात्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते दुर्गम, पहाडी भागात सेवा देत आहेत. आता त्यांचा सपाटीवरील भागात बदलीचा हक्क असतांना यंदा या बदल्याच रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आणखी एक वर्ष या शिक्षकांना दुर्गम भागात थांबावे लागणार आहे. शिवाय पुढील वर्षी जे बदलीपात्र शिक्षक होते त्यांच्यावरही या निर्णयामुळे पुढील वर्षी अन्यायच होणार आहे.
आॅनलाईन बदल्या करतांना शासनाने अवघड आणि सोपे क्षेत्र असा फरक केला आहे. अवघड क्षेत्रात प्रत्येक शिक्षकाला सेवा करणे भाग आहे. त्यानुसार अनेक महिला शिक्षिकांची अवघड क्षेत्रात बदली झाली आहे. अशा शिक्षिका आता बदलीपात्र होत्या परंतु त्यांना आणखी एक वर्ष अवघड क्षेत्रात काम करावे लाागणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनाची मोठी डोकेदुखी राहत होती. त्यामुळे राज्यस्तरावरच थेट आॅनलाईन बदल्यांचा पर्याय पुढे आला. यंदा कोरोनामुळे त्या होणार नसल्याने आॅफलाईनचे आदेश येताच प्रशासनाचा डोक्याचा ताण वाढला होता. त्यातच प्रशासकीय रद्द केल्या. परंतु नंदुरबार जिल्हा प्रशासनाने विनंती बदल्याही रद्द करून डोक्याला ताणच घेतला नाही.