धडगाव तालुक्यात ५५ मतदान केंद्रे ३१० कर्मचारी रवाना ; पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 01:01 PM2021-01-15T13:01:04+5:302021-01-15T13:01:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव :  तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी विराम मिळाला. यांतर्गत गुरुवारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या ...

310 staff sent to 55 polling stations in Dhadgaon taluka; Appointment of police officers and staff | धडगाव तालुक्यात ५५ मतदान केंद्रे ३१० कर्मचारी रवाना ; पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती

धडगाव तालुक्यात ५५ मतदान केंद्रे ३१० कर्मचारी रवाना ; पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव :  तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी विराम मिळाला. यांतर्गत गुरुवारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनात ५५ मतदान केंद्रांसाठी ३१० कर्मचा-यांना साहित्य वाटप करुन रवाना करण्यात आले. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या एकूण ५५ प्रभागात मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. 
          तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ५५ प्रभागात निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यातून अंतिम मुदतीत एकूण ४१६ अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ७९ जणांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर एकूण ३३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांचा प्रचार बुधवारी थंडावला. दरम्यान तालुक्यातील धनाजे आणि भोगवाडे येथील प्रत्येकी दोन असे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यातून २५ हजार मतदार सज्ज झाले आहेत. १३ हजार ९२ पुरूष तर १२ हजार ६६्० महिला मतदार मतदान करणार आहेत. तालुक्यात तयार करण्यात आलेल्या ५५ मतदान केंद्रांसाठी ६२ पथके तैनात करण्यात आली आहेत. यातून 310 कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रात पाच पथके राखीव ठेवण्यात आली आहे. मतदान केंद्रांसाठी सात पोलीस अधिकारी, ११४ पोलीस काॅन्स्टेबल, गृहरक्षक दलाचे ४५ जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्व कर्मचा-यांना खाजगी वाहनांनी मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे.
               दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच कर्मचारी व मतदारांनी योग्य ती खबरदारी घेत सामाजिक अंतर राखून तोंडाला मास्क लावून मतदान केंद्रावर यावे मतदान केंद्रावर आल्यावर वर योग्य काळजी घ्यावी व मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडणार नाही याचे भान राखूनच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी कळवले आहे. मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार या कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल ते टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्वच मतदान केंद्रावर आमचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संवेदशिल गावांत अधिक सुरक्षा पुरविण्यात आली असुन सर्वच केंद्रांवर आमची टीम नजर ठेवून असेल मतदारांनी देखील शांततेत मतदानाचा हक्क बजावावा असे धडगावचे पोलीस निरीक्षक दिलीप महाजन यांनी कळवले आहे.

तालुक्यात चार मतदान केंद्रे संवेदनशील 
तालुक्यातील घाटली, काकडदा, मुंदलवड, धनाजे बु्द्रुक येथील मतदान केंद्र संवेदनशील असल्याने गैरप्रकार टाळण्यासाठी त्याठिकाणी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title: 310 staff sent to 55 polling stations in Dhadgaon taluka; Appointment of police officers and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.