शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरला १३ डंपरमधून ३० टन वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना वाळू वाहतूक केल्या प्रकरणी पोलीस व महसूल प्रशासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना वाळू वाहतूक केल्या प्रकरणी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करून १३ डंपर ताब्यात घेतले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू होते.गुजरात राज्यातील हद्दीत तापी नदीपात्रात वाळूचे विविध घाट निर्माण करण्यात आले असुन तेथून वाळू उपसा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात व इतर ठिकाणी वाळू वाहतूक केली जाते. इतर राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाह्य मार्गांनी करावी असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश असल्याच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वेफाटकावर पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून नाशिककडे जाणारी तीन व औरंगाबादकडे जाणारी दहा असे १३ डंपर ताब्यात घेतले़ ही वाळू वाहतूक नियमानुसार करण्यात येत आहे, सर्व प्रकारची रॉयल्टी भरल्याचे वाहतूक करणाऱ्या चालकांकडुन सांगितले जात होते.जिल्हा सीमेलगतच्या राज्यातून इतर भागात वाळू वाहतूक सुरू झाल्यास व त्या भागात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाकडून असे जिल्हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. रेती किंवा वाळू वाहतूकीमुळे असलेले धोके पाहता प्रशासनाकडुन हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले.यात एमएच २२ एएन ३३६६, एमएच २१ एक्स ७८९९, एमएच १० सीआर १२६३, एमएच १८ एए ९०४४, एमएच २० इजी ३४७३, एमएच २० डीई ५६५०, एमएच २० ईएल ५३१३, एमएच २० ईएल ४३१३, एमएच २० डीई ६८३१, एमएच २१ बीएच ५७५८, एमएच १५ एसव्ही ७०९२, एमएच १५ ईएस ९२७९, एमएच १५ एचबी ७२९९ या वाहनांचा समावेश आहे़ सायंकाळी तहसील समोरील मैदानात ही वाहने आल्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस अधिकारी तेथे हजर झाली होती. उशिरापर्यंत वाहनांचा पंचनामा सुरु होता़