२६ युवकांचे ‘आप्पा’ बनण्याचे स्वप्न पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 01:06 PM2020-09-18T13:06:49+5:302020-09-18T13:06:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असुन सद्यस्थितीत २६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली ...

26 youths' dream of becoming 'Appa' fulfilled | २६ युवकांचे ‘आप्पा’ बनण्याचे स्वप्न पुर्ण

२६ युवकांचे ‘आप्पा’ बनण्याचे स्वप्न पुर्ण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असुन सद्यस्थितीत २६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे. पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
नंदुरबार तालुक्यातील पेसा क्षेत्रातील कोठली, पिंपळोद, पथराई, शिंदे यागावासाठी तर नॉन पेसाक्षेत्रातील रनाळे, वैदाणे गावासाठी सहा, नवापूर तालुक्यातील वडकळंबी, भादवड, धनराट गावासाठी तीन, तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, चिनोदा, नळगव्हाण, शिर्वे, तसेच सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयासाठी पाच, अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा, उमरगव्हाण, सिदुरी गावासाठी तीन, अक्राणी तालुक्यातील धनाजेसाठी एक आणि शहादा तालुक्यातील वैजाली, डोंगरगाव, कुढावद, चिखली बु., कवळीथ तर नॉन पेसाक्षेत्रातील कुकडेल, तोरखेडा, फेस या गावासाठी आठ तलाठी असे एकूण २६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
नंदुरबार तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षक विभाग वगळता कोणत्याही विभागाने पदभरती करु नये असे आदेश शासनाने दिल्यामुळे ही भरती पुर्ण होवूनदेखील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नव्हते. महसूल विभागामार्फत सदर तलाठी भरतीची कार्यवाही विनाविलंब पुर्ण करण्याबाबत जिल्हा प्रशासनास कळविले होते. त्यानुसार पदभरतीसाठी मान्यता देताच उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पेसा आणि नॉन पेसामध्ये एकाच वेळी ही भरती झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
 

Web Title: 26 youths' dream of becoming 'Appa' fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.