तळोदा पालिकेच्या सभेत २५ विषयांना मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 13:27 IST2020-10-15T13:26:59+5:302020-10-15T13:27:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार :  व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे झालेल्या  तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २६ पैकी २५ विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात ...

25 issues approved in Taloda Municipal Council meeting | तळोदा पालिकेच्या सभेत २५ विषयांना मंजूरी

तळोदा पालिकेच्या सभेत २५ विषयांना मंजूरी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार :  व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे
झालेल्या  तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २६ पैकी २५ विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. एक विषय स्थगित करण्यात आला बुधवारी झालेली ही सभा अवघ्या २० मिनिटात  आटोपण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी हे होते. मुख्याधिकारी सपना वसावे यांनी सभेचे कामकाज पाहिले.
सभेला उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, योगेश पाडवी,अंबिका शेंडे, सुनयना उदासी, बेबीबाई पाडवी, शोभाबाई भोई, भास्कर मराठे, सुरेश पाडवी, सविता पाडवी, अमानुद्दीन शेख, काँग्रेस चे प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र सूर्यवंशी,अनिता परदेशी, कल्पना पाडवी उपस्थित हाेते.  कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या सभा या व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने तळोदा पालिकेची सभा घेण्यात आली. 
 सभेत नगरसेवकांनी सभेच्या विषयांवर चर्चा केली.  यात २५ विषय मंजूर करण्यात आले. यात आंबेडकर चौकातील मोठ्या जागेत संत श्री सूरदास महाराज सभागृह बांधणे, विमल नगर मधील ज्येष्ठ नागरिक भवनाला  स्व. अरुण वडाळकर असे नामकरण करणे, मीरा गोपाळ नगरमधील लॉन्सला स्व.श्री.गोपीनाथ मुंडे असे नामकरण करणे, नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रमुख चौक कॉलनी व गल्ली यांना एलईडी डिजिटल फलक लावणे,  प्रभाग क्रमांक १,३ व ५ या परिसरात विंधनविहिर करणे यासह इतर विषय मंजूर करण्यात आले.
 व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमाने सर्वसाधारण सभा यशस्वी व्हावी यासाठी  नगराध्यक्ष व नगरसेवकांना पहिल्या सर्वसाधारण सभेच्या आधीच प्रशिक्षित तज्ञ इंजिनिअरने प्रशिक्षण दिले. पहिल्या सभेत अनेक अडचणी आल्या असल्याचे विरोधी नगरसेवकांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे  दुसऱ्या ऑनलाईन सभेत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी सभेत सहभागी होणे टाळले.
काँग्रेस नगरसेवकांचा हिरमोड 
काँग्रेसच्या नगरसेवकांनी पालिकेची सर्वसाधारण सभा ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता पालिकेच्या मोकळ्या पटांगणात घेण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे केली होती. परंतु कोराेनामुळे हे शक्य होणार नाही व शासनाच्या नियमाप्रमाणेच ही सभा ही ऑनलाईन च घेण्यात येईल सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांचा हिरमोड झाला होता. 

Web Title: 25 issues approved in Taloda Municipal Council meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.