शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील १९ जिल्ह्यात १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील १९ जिल्ह्यात १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे़ यात नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यामधील ३८ ग्रामपंचायती समाविष्ट असून येत्या महिनाभर याठिकाणी रणधुमाळी राहणार आहे़राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे़ या संबधीचे आदेश दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाला प्राप्त झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात करत अधिसूचनाही लागू करण्यात आली आहे़ शहादा, तळोदा, धडगाव आणि नवापुर या चार तालुक्यात हा निवडणूक कार्यक्रम लागू करण्यात आला असून सर्व ३८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकीच्या हालचाली गेल्या महिन्यापासून सुरुच होत्या़ स्थानिक स्तरावर कार्यकाळ पूर्ण झाल्याची माहिती असल्याने अनेकांनी तयारीही सुरु केली होती़ जिल्हा परिषद निवडणूकीनंतर कमी कालावधीत निवडणूका होत असल्याने वातावरण रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ निवडणूका जाहिर झालेली बहुतांश गावे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने निवडणूका रंगणार असल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम झाला होता़ यातील शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील काही ठिकाणी प्रभागात सदस्यपदे रिक्त आहेत़ या गावांचा पोटनिवडणूक कार्यक्रम मात्र यावेळी जाहिर झालेला नसल्याची माहिती आहे़ तब्बल महिनाभर सुरु राहणाऱ्या या निवडणूक कार्यक्रमासाठी तालुका निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन तालुकानिहाय कक्ष सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़शहादा तालुक्यातील असलोद, न्यू असलोद, राणीपूर, नागझिरी आणि कोटबांधणी येथे निवडणूक कार्यक्रम होणार आहे़तळोदा तालुक्यातील बंधारा, राणीपूर, पाडळपूऱनवापुर तालुक्यातील धनराट, धुळीपाडा, वडकंळबी, उकळापाणी, रायंगण, कोठडा, नांदवण, उमराण, केडापाडा, बंधारपाडा, केळी, ढोंग, पळसून आणि सागाळी़धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक, भोगवाडे खुर्द, उमराणी बुद्रुक, घाटली, खामला, काकरदा, आचपा, मुंदलवड, मनवाणी, खर्डा, सिसा, काकरपाटी, पाडली़ वरखेडी बुद्रुक, कुंडल आणि हातधुई या ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रम होणार आहे़सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच अशी निवड होणार असल्याने येत्या काळात सरपंचपदासाठी गत पाच वर्षांपासून मोर्चेबांधणी करणाºया इच्छुकांची धावपळ सुरु होणार आहे़ सर्वच ठिकाणी प्रथमच लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे़ येत्या काही दिवसात होलिकोत्सवही साजरा होणार असल्याने या निवडणूक कार्यक्रमाचे महत्त्व वाढले आहे़निवडणूक जाहिर झालेल्या सर्वच ३८ गावांमध्ये सोमवारपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती प्रशासकीय स्तरावरुन देण्यात आली आहे़ निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेल्या सर्वच ग्रामपंचायतींची मुदत ही एप्रिल ते जून २०२० या दरम्यान संपणार असल्याने निवडणूक कार्यक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती आहे़ आजपासून अधिसूचना लागू झाली असली तरी इच्छुकांना येत्या ६ ते १३ मार्च दरम्यान नामनिर्देशन दाखल करता येणार आहेत़ दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी १६ मार्च रोजी होणार असून १८ रोजी माघारीची अंतीम मुदत आहे़ माघारीनंतर चिन्हांचे वाटप होणार आहे़