शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूची लागण झाल्याने 18 वर्षीय युवती दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गाझी नगरातील 18 वर्षीय युवतीचा डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याने उपचार सुरु असताना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गाझी नगरातील 18 वर्षीय युवतीचा डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याने उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ 8 रोजी युवतीचा मृत्यू झाल्यानंतर शहरात डेंग्यूची साथ आटोक्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले असून घटनेनंतर आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागली आह़े     समीरा लतिफ मन्सूरी मयत युवतीचे नाव असून तिला 4 ऑक्टोबर रोजी डेंग्यूसदृश तापाची लागण झाली होती़ यानंतर तिच्या कुटूंबियांनी  तिला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होत़े प्रकृती जास्त बिघडल्याने तिला धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना तिचा 8 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता़ ही माहिती आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून गाजीनगर परिसरात सव्रेक्षण सुरु करण्यात आल्याची माहिती आह़े जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत आहेत़ नवापुर येथील दोन मुलांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने साथ आटोक्यात असल्याचे सांगितले होत़े परंतू गेल्या 15 दिवसांपासून नंदुरबार शहरात पुन्हा डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळून येत होत़े यातील बहुतांश रुग्णांना धुळे येथे दाखल करण्यात आले होत़े त्यांच्यावर उपचार पूर्ण करण्यात आल्याची माहिती आह़े जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात गेल्या आठवडय़ात आठ तर तूर्तास सहा रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आह़े 

जिल्हा रुग्णालयात यंदापासून डेंग्यूची तपासणी करण्यासाठी एलिझा टेस्टची सोय करण्यात आली आह़े तसेच डेंग्यु सदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची निर्मिती केली गेली आह़े मंगळवार्पयत या कक्षात चार रुग्ण दाखल होत़े तर डेंग्यूमुळे प्रकृती खराब असलेल्या एकास अतीदक्षता तर सुधारणा होत असलेल्या एका सामान्य विभागात ठेवण्यात आले होत़े रुग्णालयात सोय असतानाही शहरातील लागण झालेले निम्मे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत़ जिल्हा रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े 

ुयुवतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने औषध फवारणी केल्याची माहिती दिली असली तरी गेल्या आठ दिवसांपासून शहरात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढूनही प्रशासनाने गांभिर्याने घेतलेले नसल्याने नागरिकांचे म्हणणे आह़े घरात साठवलेल्या उघडय़ा पाण्यावर रसायन टाकले जात असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून जागोजागी साठून असलेल्या पाण्याचे काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आह़े धुळे चौफुली परिसरातून वाहणा:या नाल्यांचे पाणी काही ठिकाणी साचून असल्याने त्याठिकाणी डेंग्यूच्या डासांची निर्मिती होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आह़े हिवताप विभागाने माहिती दिल्यानंतर पालिका कर्मचारी त्या-त्या भागात धुरळणी व फवारणी करत असल्याचेही सांगण्यात आले आह़े