शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी पॅटर्नची केवळ चर्चाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 14:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या काळात मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका घोषित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या काळात मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका घोषित झाल्या आहेत. यांतर्गत १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानाचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर त्या-त्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व असलेले आणि वर्चस्व मिळवू पाहणारे असे सर्वच सज्ज झाले आहेत. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवला जाणार का, यावर खलबते सुरू झाली आहेत.                राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सूत्र  नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूकीत  केवळ सत्तास्थापनेसाठी वापरले गेले होते. घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतही या सूत्राची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतू  गाव तेथे पुढारी अधिक, अशी गत असल्याने महाविकास आघाडीचा झेंडा ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये फडकणार किंवा कसे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाविकास आघाडीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांचा बालेकिल्ला असलेल्या ग्रामपंचायती किती असाही प्रश्न आहे. तिन्ही पक्षांच्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी काही काळापूर्वी पक्ष बदल केला असल्याने  पूर्वाश्रमीचे बालेकिल्ले कधीच इतिहासजमा झाले आहेत. यातून ग्रामीण भागात प्रचार कोणत्या पक्षाचा करावा असा प्रश्न  स्थानिक कार्यकर्त्यांना भेडसावणार असल्याने नेत्यांना पुढे येवून महाविकास आघाडीबाबत बोलावे लागणार आहे. 

स्थानिक संस्थांमधील सरमिसळ त्रासदायक नंदुरबार जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या जोडीला एका पदावर भाजप आहे. सरमिसळ असलेल्या या राजकारणामुळे ग्रामीण भागात विकासाच्या नावाने मते मागणार कसे असाही प्रश्न आहे. ग्रामपंचायत निवडणूका ह्या बाहेरुन निरपेक्ष असल्या तरी आतून त्या पक्षीय असल्याने नेत्यांची कसरत होईल.  

शिवसेना व काँग्रेसमध्येच होणार निर्णायक लढाईधडगाव, नंदुरबार हे दोन तालुके शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांना समोरासमोर आणण्याची शक्यता आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायती ह्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असल्याने शिवसेना त्यावर आतापासून हक्क सांगत आहे. दुसरीकडे धडगाव तालुक्यात काकर्दा व इरत ग्रामपंचायतींवर काँग्रेस व शिवसेना दोघांमध्येच लढत आहे. 

तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबत जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याकडून स्पष्टीकरण अथवा संकेतही देण्यात आलेले नाहीत. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर निवडणूकीसाठी तयार असलेले इच्छुक नेत्यांकडे चकरा मारत असले तरी त्यांच्याकडून नेत्यांनी आघाडीचा पर्याय दिलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली ग्रामपंचायत निवडणूका होण्याची शक्यता धूसर आहे.  

लढल्यास काय परिणाम?महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूका लढवल्यास यशाचे गणित बदलणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक पक्षाचे त्या-त्या तालुक्यात वर्चस्व आहे. यातून तिघांनी आपल्या बलस्थानांवर एकमेकांना मदत करुन निवडणूक लढवल्यास जास्तीत जास्त ग्रामपंचायती त्यांच्या हाती येणार आहेत.