शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : 109 अपक्षांनी अजमावले नशीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दर निवडणुकीत आणि प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असतात. काहीजण नुसतेच उमेदवारी करायचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दर निवडणुकीत आणि प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असतात. काहीजण नुसतेच उमेदवारी करायचे म्हणून करतात तर काहीजण थेट विजयाच्या इर्षेने मैदानात उतरतात. आतार्पयतच्या 12 निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारसंघातून 109 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोघांच्याच गळ्यात विजयाची माळ पडून आमदारकी मिळू शकली आहे. दरम्यान, या निवडणुकीत देखील नऊ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.   प्रत्येक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा सामना प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना करावा लागतो. यंदा देखील जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात अपक्षांनी कडवे    आव्हान उभे केले आहे. यात अक्कलकुवा मतदारसंघात नागेश पाडवी, नवापूर मतदारसंघात शरद गावीत तर शहादा मतदारसंघात जेलसिंग पावरा यांचा त्यात समावेश आहे. शहादा मतदारसंघात 2009 च्या निवडणुकीत सर्वाधिक अर्थात नऊ अपक्ष उमेदवार होते. त्यानंतर 2004 च्या निवडणुकीत या मतदारसंघात आठ अपक्ष होते. 1978 च्या निवडणुकीत ही  तीन अपक्षांनी नशीब अजमविण्याचा प्रय} केला होता. अर्थात 2004 र्पयत जिल्ह्यातील शहादा हा एकमेव सर्वसाधारण मतदारसंघ असल्यामुळे अनेकांच्या उडय़ा या मतदारसंघावर पडत    होत्या.यंदाही नऊ उमेदवार रिंगणातयंदाच्या निवडणुकीत देखील नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात सर्वाधिक उमेदवार नवापूर मतदारसंघात चार आहे. तर अक्लककुवा व नंदुरबार मतदारसंघात प्रत्येकी दोन तर शहादा     मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार यंदा नशीब अजमावत आहेत. यातील नवापूर, अक्कलकुवा व शहाद्याच्या अपक्ष उमेदवारांनी यंदा लक्ष वेधले आहे. मतांची टक्केवारी जेमतेमचअपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतांची टक्केवारी देखील जेमतेमच राहत आहे. केवळ 11995 च्या निवडणुकीचा अपवाद राहिला आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील पाच पैकी दोन मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून गेले होते. त्यात नंदुरबार मतदारसंघातून डॉ.विजयकुमार गावीत तर अक्राणी मतदारसंघातून अॅड.के.सी.पाडवी हे निवडून आले होते. त्या निवडणुकीत अपक्षांनी घेतलेल्या मतांची संख्या तब्बल 1 लाख 45 हजारापेक्षा अधीक होती.  दोघांना संधीनंदुरबार मतदारसंघातून आतार्पयत 16 अपक्षांनी आपले भाग्य अजमावले आहे. पूर्वीचा अक्राणी व आताचा अक्कलकुवा मतदारसंघातही अनेकांनी नशीब अजमविण्याचा प्रय} केला आहे. अकरा निवडणुकांमध्ये एकुण 25 अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. या मतदारसंघात 1995 मधील निवडणुकीत सात अपक्ष उमेदवार उभे होते.प्रत्येक निवडणुकीत अपक्षांचा भरणा मोठय़ा प्रमाणावर असतो. काही अपक्ष प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून देखील उभे केले जातात. जेणेकरून आपला प्रतिस्पर्धी उमेदवार अडचणीत यावा. शिवाय जात-पात आणि पक्षाचा देखील अपक्ष उभे करतांना विचार केला जातो. याचा सर्वाधिक फटका शहादा मतदारसंघात बसत आहे. शहादा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होता तेंव्हा अनेकांच्या उडय़ा पडत होत्या. आता आदिवासी राखीव झाला असला तरी तीच परिस्थिती गेल्या तीन निवडणुकीत दिसून आली आहे.

आतार्पयत सर्वाधिक अपक्ष उमेदवारांची संख्या शहादा मतदारसंघात कायम, यंदा मात्र केवळ एक अपक्ष उमेदवार रिंगणातकेवळ 1995, 2004 व 2009 च्या निवडणुकीतच अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज पोहचली एक लाखांच्या वर.यंदाच्या निवडणुकीत नऊ अपक्ष उमेदवार आहेत. परंतु अक्कलकुवा, नवापूर व शहादा मतदारसंघातील अपक्षांनी लक्ष वेधले आहे.अनेकवेळा प्रमुख उमेदवाराकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते फोडण्यासाठी देखील अपक्षाला उभे केले जाते.