सौरकृषी पंपासाठी 1 हजार शेतक:यांनी दाखल केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:03 PM2019-02-15T12:03:02+5:302019-02-15T12:03:06+5:30

बोरद : राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसाठी वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागातून 1 हजार 100 शेतक:यांनी ...

1 thousand farmers for Solarishi pumps: | सौरकृषी पंपासाठी 1 हजार शेतक:यांनी दाखल केले अर्ज

सौरकृषी पंपासाठी 1 हजार शेतक:यांनी दाखल केले अर्ज

Next

बोरद : राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसाठी वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागातून 1 हजार 100 शेतक:यांनी अर्ज दाखल केले आहेत़ योजनेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून लवकरच शेतक:यांना अधिक क्षमतेच्या मोटारी मिळणार आहेत़ 
कृषी क्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून सौरकृषी पंपांची योजना अंमलात आणली गेली आह़े यांतर्गत शेतक:यांना 3 आणि 5 हॉर्सपावरच्या पाणमोटारी कोटेशन रक्कम भरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़ 3 हॉर्सपावरची मोटार साधारण 2 लाख 55 तरर 5 हॉर्सपावरची मोटार साधारण 3 लाख 65 हजार रुपयांची आह़े यासाठी शेतक:यांना नाममात्र रक्कम भरण्याचे अट आह़े गेल्या महिनाभरापासून शहादा विभागातील वीज कंपनीच्या कार्यालयांमध्ये या योजनेच्या कामाला गती आली असून अर्जाची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े शेतक:यांच्या सोयीची योजना असल्याने त्यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात येत असल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आह़े यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शेतीसिंचनासाठी वाढीव क्षमतेच्या मोटारींची गरज असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े यासाठी योजनेत सहभाग वाढत असल्याचे दिसून आले आह़े सातबारा, कूपनलिका, विहिरीचा पुरावा, आधारकार्ड आणि जातीचा दाखला देत शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करुन दिले आहेत़ यात तीन हॉर्सपावरची मोटार हवी असलेल्या अनुसुचित जाती व जमातीच्या शेतक:यांना 12 हजार 700 तर पाच हॉर्सपावरच्या मोटारीसाठी 19 हजार 250 रुपये भरावे लागणार आहेत़ सर्वसाधारण संवर्गातील शेतक:यांना 3 हॉर्सपावरसाठी 25 हजार 500 तर पाच हॉर्सपावरच्या मोटारीसाठी 38 हजार 500 रुपये भरावे लागणार आहेत़ ही रक्कम भरुन चांगल्या दर्जाच्या मोटारी मिळून शेतीसिंचन होणार असल्याने शेतक:यांकडून प्रतिसाद दिला जात आह़े  खासकरुन दुर्गम भागातील शेतक:यांचा शेतक:यांचा या योजनेकडे ओढा असल्याचे वीज कंपनीच्या कार्यालयातील वाढत्या गर्दीवरुन दिसून येत आह़े 
 

Web Title: 1 thousand farmers for Solarishi pumps:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.