शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

Maharashtra election 2019 : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्याचा मुद्दा पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 6:11 AM

अशोक चव्हाण भोकरमधून रिंगणात । वसंतराव चव्हाण, डी. पी. सावंत सलग तिसऱ्यावेळी, तर प्रदीप नाईक चौथ्यांदा मैदानात

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि बंडखोरांमुळे चुरस वाढली आहे. शिवसेना-भाजपचा राष्टÑीयस्तरावरील मुद्दे प्रचारात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी मतदारसंघातील स्थानिक मुद्यांमुळेच निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेस सरसावल्याचे चित्र असून, भाजपा आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांनी शहर महानगराध्यक्षपदाचा राजीनामा देत बंडखोरी केल्याने येथे आता चौरंगी सामना रंगला आहे. हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील येथून मैदानात असल्याने सेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. नांदेड उत्तर मतदारसंघातही चौरंगी सामना होत असला तरी येथे काँग्रेसचे डी. पी. सावंत यांच्यासमोर शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांनी आव्हान उभे केले आहे. येथे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे. किनवटमध्ये प्रदीप नाईक यांच्यासमोर भाजपाने ऐनवेळी भीमराव केराम यांना उमेदवारी दिली. येथे भाजपाचे नाराज झालेले इच्छुक केराम यांना कितपत मदत करतात, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.काय आहे उर्ध्व पैनगंगा पाणीप्रश्नउर्ध्व पैनगंगा प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती़ परंतु, मागील काही वर्षात त्यात घट होत आज ८० ते ९० हजार हेक्टरलाच पाणी मिळत आहे़ त्यातच यंदा नांदेडकडे येणारे पाणी पुसद आणि हिंगोलीकडे पळविण्यात आले़यासंदर्भात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून प्रचारादरम्यान केला जात आहे़ या प्रकारामुळे अर्धापूर, उमरी, धर्माबाद, भोकर, मुदखेड तालुक्यातील जवळपास १५ जे २० हजार हेक्टरला फटका बसण्याची शक्यता असून याप्रकरणी माधवराव कदम, भगवानराव तिडके यांनी जलप्राधिकरणाकडे धाव घेतली आहे़नांदेडचे पाणी पळविण्यामागे भाजप सरकारचा हात असल्याचे सांगत यामुळे भविष्यात नांदेड जिल्ह्याचे वाळवंट होईल, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून केला जात आहे़

रंगतदार लढतीसर्वाधिक ३८ उमेदवार रिंगणात उतरल्याने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. येथे शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यासमोर भाजपाच्या दिलीप कंदकुर्ते यांनी बंडाचा झेंडा फडकाविला आहे. काँग्रेसकडून मोहन हंबर्डे तर वंचित आघाडीकडून फारुख अहमद रिंगणात आहेत.नायगाव मतदारसंघातही चुरशीचा तिरंगी सामना होत आहे. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण अणि भाजपाचे राजेश पवार यांनी प्रचारात जोर लावला आहे. येथे वंचित आघाडीचे मारोतराव कवळे गुरुजी यांची मते निर्णायक ठरतील.हदगाव मतदारसंघात शिवसेनेचे नागेश पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने माधवराव पवार यांना रिंगणात उतरविले आहे. मात्र सेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांच्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.भोकरमध्ये भाजपचाआयात उमेदवारभोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपचे बापूसाहेब गोरठेकर आहेत. राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या गोरठेकरांना आयात करीत भाजपने उमेदवारी बहाल केली. येथे प्रचारात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्याचा मुद्दा पेटलेला आहे. नायगावमध्ये वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून तिसºयावेळी रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राजेश पवार हे भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी लढत देत आहेत.मात्र वंचित बहुजन आघाडीने मारोतराव कवळे यांना रिंगणात उतरविल्याने तिरंगी सामना होत आहे.हदगाव मतदारसंघातयंदा चुरशीची तिरंगी लढतहदगाव मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्यासमोर माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे येथेही चुरशीची तिरंगी लढत होत आहे. देगलूरमध्ये शिवसेनेचे सुभाष साबणे आणि काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर तर मुखेडमध्ये भाजपचे तुषार राठोड व काँग्रेसचे भाऊसाहेब मंडलापुरकर यांच्यात सामना होत आहे. लोहा मतदारसंघात शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांना भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकरांचे पाठबळ असल्याने शिवसेनेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.