शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

इसापूरच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:46 AM

विष्णूपुरी प्रकल्पातील झपाट्याने कमी होणाऱ्या पाण्याची चिंता नांदेडकरांना लागली असून, केवळ जवळपास ६० दिवस पुरेल इतकाच जलसाठा विष्णूपुरीत उरला आहे.

ठळक मुद्दे‘विष्णूपुरी’त झपाट्याने घट अवैध पाणीउपसा रोखणारी पथके कागदावरच

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील झपाट्याने कमी होणाऱ्या पाण्याची चिंता नांदेडकरांना लागली असून, केवळ जवळपास ६० दिवस पुरेल इतकाच जलसाठा विष्णूपुरीत उरला आहे. परिणामी आता इसापूर प्रकल्पाच्या पाण्याचे महत्त्व वाढले असून इसापूर प्रकल्पातील दुसºया टप्प्यांतील पाणी कधी येईल, याकडे आता लक्ष लागले आहे.इसापूर प्रकल्पातून दोन दलघमी पाणी नांदेडसाठी सोडण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. यापूर्वी दोन दलघमी पाणी घेण्यात आले होते. त्यातील एक दलघमी पाणी सांगवी बंधाºयापर्यत पोहोचले. दुस-या टप्प्यातील पाणी पोहोचण्याची प्रतीक्षा केली जात आहे.अर्धापूर तालुक्यातील पार्डी कॅनालद्वारे हे पाणी आसना नदीच्या सांगवी बंधा-यात पोहोचणार नाही. जवळपास ७७ किलोमीटर अंतर पार करुन हे पाणी सांगवी बंधा-यात पोहोचेल. त्यानंतर काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सदर पाणी उत्तर नांदेडला पुरविले जाणार आहे. या आठवड्यात पाणी उपलब्ध झाल्यानंतर उत्तर नांदेडची जवळपास २० ते २५ दिवसांची तहान भागणार आहे. यामुळे विष्णूपुरी प्रकल्पावरील ताण थोडा कमी होणार आहे.दुसरीकडे, विष्णूपुरी प्रकल्पातून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सात पथकांंनी गाशा गुंडाळला आहे. परिणामी अवैधरित्या होणारा पाणी उपसा जोमाने सुरु आहे. अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेले पथके महावितरण, पोलीस विभाग तसेच अन्य विभागाच्या असहकार्यामुळे गुंडाळण्यात आले. याबाबत महापालिकेच्या १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली होती. नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांच्या दबावातूनच पाणीउपसा रोखण्याची कारवाई थांबविल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. अवैध उपसा रोखण्यासाठी पथके कार्यान्वित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली जाईल, अशी माहिती आयुक्त लहुराज माळी यांनी महापालिका सभागृहात दिली होती. पथकांच्या स्थापनेबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात आगामी काळात पाणीटंचाईचे तीव्र संकट ओढवण्याची चिन्हे स्पष्ट असताना महापालिकेकडून मात्र कोणत्याही उपाययोजना हव्या त्या गतीने सुरु नसल्याचेच स्पष्ट होत आहे. केवळ स्थानिक आमदारांचा निषेध करुन नगरसेवक शांत झाले आहेत. १४ फेब्रुवारीच्या सभेत नगरसेवकांनी पाण्याच्या विषयावर न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. पाच दिवसांत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन पाण्याच्या विषयावर आणखी किती दिवस हातावर हात ठेवून शांत बसणार आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ऐनवेळी पाण्यासाठी शहरवासीयांना फिरायची वेळ येते की काय? असा प्रश्न भेडसावत आहे.नांदेडसाठी ५५ दलघमी पाणी आरक्षितगोदावरी नदीच्या काठी वसलेल्या जवळपास साडेसहा लाख लोकसंख्येच्या नांदेड शहरासाठी महापालिकेने विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी तर इसापूर प्रकल्पात १५ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. त्याचवेळी डिग्रस बंधा-यातूनही १० दलघमी पाणी नांदेडसाठी घेण्यात आले आहे. तब्बल ५५ दलघमी पाणी शहरासाठी आरक्षित असताना पाण्यासाठी शहरवासीयांना भटकंती करायची वेळ दरवर्षी येत आहे. त्यामुळे दरवर्षीच उद्भवणारे राजकीय वादविवाद टाळण्यासाठी महापालिकेने पाण्याच्या प्रश्रावर योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण