सुटी संपली, तिकीटही बुक केलं; पण पूजेसाठी फुले तोंडताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:01 IST2023-11-23T16:37:22+5:302023-11-23T17:01:00+5:30

पूजेसाठी फुले तोडत असताना विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Vacation is over, tickets are also booked; But the young man died due to electricity shock while picking flowers for worship | सुटी संपली, तिकीटही बुक केलं; पण पूजेसाठी फुले तोंडताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू 

सुटी संपली, तिकीटही बुक केलं; पण पूजेसाठी फुले तोंडताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू 

- शब्बीर शेख
देगलूर:
पूजेसाठी घराच्या छतावर चढून झाडांची फुले तोडत असताना विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुणाचा आज सकाळी ११.३० वाजता जागीच मृत्यू झाला. तेजस वसंतराव ढगे असे मृताचे नाव असून ही घटना शहरातील नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अंबिकानगर येथे घडली.

तेजस वसंतराव ढगे सकाळी पूजेसाठी लागणारी फुले तोडण्यासाठी घराच्या छतावर गेला.लोखंडी सळईने फुले तोडत होता. यावेळी अंदाज न आल्याने सळईचा स्पर्श विद्युत तारांना होऊन तेजसला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

आजच जाणार होता पुण्याला 
शहरातील शिलाई मशीन विक्रीचे प्रसिद्ध व्यावसायिक असलेले वसंतराव ढगे यांचा तेजस हा मोठा मुलगा. तेजस हा पुणे येथे बीबीए पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त तो आठ दिवसांपूर्वी देगलूर येथे घरी आला होता. सुट्ट्या संपल्यामुळे तो आजच पुणे येथे जाणार होता. त्यासाठी त्याने तिकीटही बुक केले होते.तत्पूर्वी त्याच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Vacation is over, tickets are also booked; But the young man died due to electricity shock while picking flowers for worship