शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

हदगाव तालुक्यात दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:06 IST

मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे.

हदगाव : मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे.मनाठा येथील यश सुनील चौरे हा ९ वीत होता. सेमीवर्गाला असल्याने त्याच्या पालकाने त्याला नांदेड येथे शिकवणी लावून खाजगी वसतिगृहात ठेवले होते. सहा महिने तो नांदेडला व्यवस्थित राहिला. दिवाळीच्या सुटीत तो गावी मनाठा येथे आला होता. सुट्या संपल्याने सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी तो नांदेड येथे वसतिगृहात गेला, मंगळवारी रात्री लगेच तो गावी आला. वसतिगृहातील अन्य मुले आली नाहीत, असे त्याने घरी सांगितले. गुरुवार, २८ रोजी सकाळी त्याचा मोठा भाऊ रजत नांदेडला कॉलेजला जात होता. रजतसोबत यशनेही जावे, असे पालकांचे म्हणणे होते.मात्र तो गेला नाही. पालकांनी त्याला जाब विचारला, याचाच राग मनात ठेवून यशने सकाळी ८.३० च्या दरम्यान स्कार्फने गळफास लावला.दुसरी घटना सावरगाव येथे घडली. अभिषेक बबन ठाकूर (वय १७) असे मयताचे नाव आहे. तो अकरावीला होता. हदगावला तो शिकायला होता. नवीन पद्धतीने (कोंबडा पद्धत) कटींग केल्याने त्याचे वडील त्याच्यावर रागावले व गावातील केशकर्तनालयात नेवून त्याची साधी कटींग केली. याचाच राग मनात ठेवून अभिषेकने ३० रोजी आईवडील शेतात गेल्याची संधी साधून राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांनी हदगाव तालुकावासिय हादरले. पहिल्या घटनेत मुलाच्या मनाप्रमाणे त्याला वसतिगृहात न पाठविता गावातच राहू दिले असते तर, दुसºया घटनेत पालकांनी मुलाच्या कटिंगकडे दुर्लक्ष केले असते तर दोन्ही घटना टळल्या असत्या, अशी चर्चा सुरु झाली.खेड्यातील शाळेची गुणवत्ता टिकून राहिली तर पालक त्यांच्या पाल्यांना शहराकडे पाठविणार नाहीत. गुणवत्तावाढीची जबाबदारी संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचीही नाही का ? शाळेतील शिक्षणाच्या धड्याशिवाय जीवन जगण्याचे धडे देण्याचे गुरुजी विसरले काय? कथा, कहाण्या सांगून मोठे होण्याचे स्वप्न गुरुजी विद्यार्थ्यांना पाहावयास लावत असत, ती कला सध्याचे शिक्षक विसरलेत काय? असा सवाल आहे.एकूणच पालकांनी आता या दोन्ही घटनांपासून सावध राहण्याची गरज आहे. आत्महत्या करणारा तर निघून जातो, मात्र पालकांना तो मरेपर्यंत यातना देतो, त्यामुळे पालकांनी आता मुलांसोबत प्रेमानेच बोलले पाहिजे, असे शिकावे, अशीही चर्चा सुरु आहे.मुलांना रागावण्याचाही अधिकार पालकांना नाही?या दोन्ही घटनांनी मात्र पालकवर्ग कमालीचा धास्तावला आहे. मुलांसोबत राहावे कसे ? तो चुकत असेल तर त्याला बोलूही नाही का? असे नानाविध प्रश्न यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पोटाला चिमटा देवून ते यासाठी वाट्टेल ते करतात. स्वत:च्या गरजा कमी करुन पाल्यांना सुविधा देतात. आपल्या काळात न मिळालेल्या सुविधा, मुलांना तरी मिळाव्यात, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. असे वाटणे चुकीचे आहे का? आजचे पालकही २० ते २५ वर्षांपूर्वी विद्यार्थी होते. त्यांनीही अडचणीवर मात केली. या अडचणी मुलांना येवू नयेत, म्हणून त्यांना शहरात ठेवले जाते.गर्भ वाढवण्यासोबत तो मोठा होईपर्यंत मुलाची आई किती काळजी घेते, तिला रागावण्याचाही अधिकार मुलांनी देवू नये का ? असा सवाल पालकांचा आहे.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीSchoolशाळा