शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

दत्त शिखर घाटात रिक्षा उलटून तेरा भाविक जखमी; दोन गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 6:03 PM

सकाळी १०. ३० वाजता घडलेल्या या अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत. 

श्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) :  माहूर गाढावरील  श्रीदत्त शिखर घाटातून वाझरा येथील शेख फरीद बाबा दर्गाह येथे कंदोरी (न्याज) करण्यासाठी जात असताना वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटून १३ भाविक जखमी झाले. आज शुक्रवारी (दि. २२ ) सकाळी १०. ३० वाजता घडलेल्या या अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या मौजे वाकान कोंदरी येथील चार परिवारातील भाविक दर वर्षी प्रमाणे शेख फरीद दर्गाह येथे कंदोरी (न्याज)  करण्यासाठी सकाळी आॅटो (क्ऱएम़एच़२९-८८६१) व एक टाटा टेम्पो घेऊन निघाले होते. ऑटोत  १३ भाविक आॅटो चालकासह तर टेम्पोत १५ भाविक प्रवास करीत होते़ टेम्पो शिखर घाटातून पुढे निघून गेला तर ऑटो मागून घाटातून हळूहळू जात होता.

घाटातील शेवटच्या वळणावर चालक सै़जैनूल्ला खान (वय २०) याचा आॅटोवरील ताबा सुटल्याने ऑटोने दोन पलट्या खाल्ल्या़ यात बसलेले सैक़रीम सै़सलीम (वय १९) व शे़अल्ताफ शे़मौला या दोघांना गंभीर मार लागला़ उत्तम लोंढे (वय ६०), अरुण वंजारे (वय ५३), शेग़फुरला शे़ बाबाअली (वय ५०), शे़रफिक शे़ फरीद (वय ४३), सै़हुसेन सै़छोटू (वय ४०), राजू घड्याळे (वय ३२), सुनील वंजारे (वय २३), गजानन घड्याळे (वय ३३), पांडुरंग लोंढे (वय ५०), शे़शोएब शे़अखतर (वय १७) हे किरकोळ जखमी झाले आहेत़

वझरा येथे कामानिमित्त जात असलेले सुजाण भारती यांनी घटना पाहून दोन्ही गंभीर जखमींना आपल्या मोटारसायकलवरून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आणि त्यांच्या पुढे गेलेल्या भाविकांना घटनेची माहिती दिली़ त्यामुळे दुसऱ्या वाहनाने उर्वरीत भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ रुग्णालयात डॉ़वाघमारे व परिचारिका यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी दोघांना यवतमाळ येथे पाठविण्यात आले़ इतर भाविकांना उपचार करून सुट्टी देण्यात आली़ रुग्णालयातून देण्यात आलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे़ 

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेडhighwayमहामार्ग