शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

धनगरांसोबत विश्वासघातकी राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:25 AM

आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धनगर समाजाचा विश्वासघात केला. कारण, ज्या शिडीवर पाय ठेवून आमदार, खासदार वर गेले त्यांनी आपले घर सावलीत बांधून तुमचे घर उन्हात बांधले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा आरोप धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही

लोहा : आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धनगर समाजाचा विश्वासघात केला. कारण, ज्या शिडीवर पाय ठेवून आमदार, खासदार वर गेले त्यांनी आपले घर सावलीत बांधून तुमचे घर उन्हात बांधले. तुमच्यामुळेच २०१४ ला राज्य व केंद्रात सत्तापरिवर्तन झाले. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करणार नसल्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रेतील कुस्ती मैदानालगत धनगर आरक्षण जागर महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ना. पंकजा मुंडे बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आयोजक गणेश हाके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खा. विकास महात्मे, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ. गोविंद केंद्रे, देवीदास राठोड, अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे, विठ्ठल रबदाडे, कल्याणी वाघमोडे, निहारिका खोलगे, जि. प. सदस्य दशरथ लोहबंदे, सरपंच गोविंदराव राठोड, माजी जि. प. सदस्य भगवान हाके यांची उपस्थिती होती.प्रारंभी पंकजा मुंडे यांनी हेलिकॉप्टरने पूर्ण माळेगाव यात्रेवर फेरी मारली व खंडेरायाचे दर्शन घेऊन सभास्थळी दाखल झाल्या. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर व कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने काठी आणि घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला़यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यातील, देशातील विकास व सामान्य माणसांच्या हितासाठी केलेल्या कामाच्या जोरावर भाजपा पुन्हा सत्ता पादाक्रांत करणार आहे. धनगर आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहिले तर काठी उगारल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अहिल्यादेवीच्या आदर्शाने राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविली.अहिल्यादेवींनी बांधलेले घाट, विहिरी, बंधारे आजही शाबूत आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेली कामे कागदोपत्रीच झाली. विकास कागदावरच झाला. त्यांनी स्वत:ची खळगी भरण्याचे काम केले. म्हणून राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेस- राष्ट्रवादीकडे सत्तर वर्षे सत्ता होती़ शेतकऱ्यांना दिलासा का नाही मिळाला. त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सत्ता परिवर्तन न करता भाजपाला पुनश्च सत्तेत पाठवा. मला सत्तेची लालसा नाही वंचितासाठी मी राजकारणात आहे. मला जातीपातीचे राजकारण आवडत नाही. आरक्षणासाठी मी तुमच्या संघर्षात सोबत आहे. वेळ पडली तर मी आंदोलनात सहभागी होईल.धनगर समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ५० कोटी खर्चून योजना आणली, पोहरादेवीच्या विकासासाठी २५ कोटी रूपयांचा निधी दिला. भक्तिस्थळापासून शक्तिस्थळापर्यंत कामे केली. राष्ट्रवादीचा आरक्षणाचा डाव फेल गेला़ पुढे राष्ट्रवादीच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या आहेत.धनगर समाजबांधवांनो तुम्हाला शक्तिप्रदर्शन, आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. गरज पडल्यास मी आंदोलनात सहभागी असेल़ असेही त्या म्हणाल्या़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.सदस्य चंद्रसेन पा. गौडगावकर यांनी तर व्यंकट मोकले यांनी आभार मानले.अमित शहा आज नांदेडातभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवारी नांदेड विमानतळावरुन हेलिकॉप्टरने लातूरला गेले़ रविवारी शहा यांनी तीन जिल्ह्यांतील भाजपा पदाधिका-यांची बैठक घेवून आढावा घेतला़ त्यानंतर रात्री शहा हे लातूरलाच मुक्काम करणार आहेत़ त्यानंतर सोमवारी सकाळी ते हेलिकॉप्टरने नांदेडला येणार आहेत़ सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी त्यांचे नांदेडात आगमन होणार आहे़ त्यानंतर ते सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी रवाना होणार आहेत़ गुरुद्वारा दर्शनानंतर ते काही वेळ शहरात थांबणार आहेत़ त्यानंतर ११ वाजता नांदेड विमानतळावरुन ते दिल्लीकडे रवाना होतील़

टॅग्स :NandedनांदेडReligious programmeधार्मिक कार्यक्रमPankaja Mundeपंकजा मुंडेMahadev Jankarमहादेव जानकरreservationआरक्षण