शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

नांदेड जिल्ह्यात चोरट्यांची दिवाळी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 6:44 PM

सलग चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास 

ठळक मुद्देबंद घरे चोरट्यांकडून टार्गेट

नांदेड : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे दिवाळं निघाले असतानाच जिल्ह्यात चोरट्यांची दिवाळी मात्र जोरात सुरु आहे़ गेल्या आठवडाभरात चोऱ्यांचे सत्रच सुरु आहे़ नायगावमध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोडी केल्यानंतर गुरुवारी रात्री रविनगर भागात एका घरातून चोरट्यांनी जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे़ या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत़ त्यामुळे गावाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी गेलेल्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे़

दरवर्षी दिवाळीच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते़ अनेकजण दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जातात़ याच संधीचा फायदा घेत चोरटे आपला डाव साधतात़ धनत्रयोदशीच्या दिवशी सराफा व्यापारी रवींद्र चक्करवार यांचा खून करुन त्यांच्या दुकानातील ऐवज पळविण्यात आला होता़ त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी कलबंर बु़ गावाकडे जाणाऱ्या अन्य एका सराफा व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील दहा तोळे सोने चोरट्याने लंपास केले होते़ सिडको भागातील एका अपार्टमेंटमध्ये सलग बारा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी माल लंपास केला़ सलग घडणाऱ्या या घटनांमुळे खळबळ उडाली असताना गुरुवारी रात्री पुन्हा सिडको परिसरात एका दुचाकीस्वाराला अडवून चाकूचा धाक दाखवित लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला़ परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा रविनगर भागाकडे वळविला़ 

सिद्धार्थ सोनकांबळे हे दिवाळीसाठी उमरखेड या गावी गेले होते़ चोरट्यांनी त्यांचे घर फोडून जवळपास दीड लाखांचा ऐवज लांबविला़ परंतु त्यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले़ नांदेड ग्रामीण पोलिसांनीही या चोरट्यांची ओळख पटविली आहे़ या तीन चोरट्यांनीच सिडको भागात चोरी केल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे़ तर नायगाव तालुक्यातील वडगाव येथे प्रकाश नागनाथ जाधव यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख दहा हजार असा एकूण २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़ जाधव हे मित्राच्या घरी झोपण्यासाठी गेले होते़ त्यावेळी ही घटना घडली़ अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे नागेली येथे गजानन बालाजी गव्हाणे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला़ लाकडी पलगांच्या बॉक्समधील रोख ५० हजार रुपये चोरट्यांच्या हाती लागले़ किनवट येथील साईनगरमध्ये चोरट्यांनी मोबाईल आणि पाच हजार रुपये लांबविले़ अपूर्णा रवी तिरमवार ही मुलगी आईसोबत देव दर्शनासाठी गेली होती़ चोरट्याने पाठीमागील खिडकीचा गज वाकवून आत प्रवेश केला होता़ जिल्ह्यात दिवाळीच्या काळात सलग चोरीच्या घटना घडल्या आहेत़ या चोरट्यांना आवर घालण्यात पोलिसांना मात्र यश आले नाही़ 

आपला शेजारी खरा पहारेकरी बासनातभाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोउपनि चंद्रकांत पवार यांनी दोन वर्षांपूर्वी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ ही संकल्पना राबविली होती़ त्या अंतर्गत त्या भागातील तरुणांचे पथक तयार करण्यात आले होते़ हे तरुणांचे पथक आपल्या भागात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीवर लक्ष ठेवत होते़ त्याचबरोबर रात्रीच्या वेळी गस्त घालताना पोलिसांना मदतही करीत होते़ त्यामुळे भाग्यनगर परिसरातील चोऱ्यांचे प्रमाण बऱ्याचअंशी कमी झाले होते़ परंतु ही संकल्पनाही आता गुंडाळण्यात आली आहे़ दिवाळीच्या काळात नागरिक जर घर बंद करुन बाहेरगावी जाणार असतील तर काय काळजी घ्यावी ? याबाबत जनजागृती करणारे पत्रकही ठाण्याच्या वतीने छापण्यात आले होते़ या संकल्पनेला नागरिकांचाही प्रतिसाद होता़ 

आनंदनगर रस्त्यावर शेतकऱ्याला लुबाडलेआनंदनगर ते वसंतनगर जाणाऱ्या रस्त्यावर एका शेतकऱ्याला अडवून लुबाडल्याची घटना ३० आॅक्टोबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली़ नवनाथ मारोतराव कदम हे आनंदनगर ते वसंतनगर पायी जात होते़ त्याचवेळी मागाहून स्कुटीवरुन आलेल्या तिघांनी कदम यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतला़  घरात लाखोंचा माल असताना अनेकजण कमी किमतीचे अन् दुय्यम दर्जाचे कडीकोंडे वापरतात़ हे कडीकोंडे तोडणे चोरट्यांना सहज जाते़ मागील काही दिवसांत झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी फार कष्ट न घेता केवळ कडीकोंडेच उचकले हे दिसून येते़ त्यामुळे कमी किमतीचे कडीकोंडे वापरणे अनेकांना चांगलेच महागात पडले आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीNandedनांदेडPoliceपोलिस