भोकर स्थानकाजवळ रेल्वेसमोर उडी घेत प्रेमीयुगुलांनी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 18:55 IST2022-11-11T18:54:53+5:302022-11-11T18:55:35+5:30

भोकर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूलाखाली धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली.

The lovers ended their lives by jumping in front of the train near Bhokar station | भोकर स्थानकाजवळ रेल्वेसमोर उडी घेत प्रेमीयुगुलांनी संपवले जीवन

भोकर स्थानकाजवळ रेल्वेसमोर उडी घेत प्रेमीयुगुलांनी संपवले जीवन

भोकर (नांदेड) : आदिलाबाद ते मुंबई धावणाऱ्या नंदिग्राम एक्स्प्रेसखाली एका प्रेमीयुगुलांने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली आहे. शिवराज मनोज क्यातमवार ( २२, रा. कासारगल्ली भोकर व धारा माधव मोरे ( रा. रिठ्ठा ता. भोकर) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांचे नाव आहे. 

आदिलाबाद ते मुंबई धावणारी नंदिग्राम एक्स्प्रेस भोकर स्थानकाकडे रवाना झाली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्थानकांपासून काही अंतरावर असलेल्या भोकर ते नांदेडरेल्वे उड्डाणपूलाखाली शिवराज आणि धारा या दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 
मृत धाराच्या पश्चात आईवडील अल्पभूधारक शेतकरी असून लहान भाऊ व चौघी बहिणी आहेत. मृत धारा मोरे ही सर्वात मोठी होती. ती आयटीआय झाल्यानंतर घरी रिठ्ठा येथे परिवारासह रहत होती. तर मृत युवक येथील महाविद्यालयात बीकॉम तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होता. यासोबतच तो वडिलांना दुकानात मदत करत असे. त्याच्या पश्चात आईवडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. दोन बहिणी पैकी एकीचे दिवाळीपूर्वी लग्न झाले होते. या दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: The lovers ended their lives by jumping in front of the train near Bhokar station