चिमुकली शाळेत जायला तयार नव्हती; पालकांनी विचारताच उघडकीस आली अत्याचाराची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:27 IST2025-11-21T12:27:02+5:302025-11-21T12:27:15+5:30
भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकास ताब्यात घेतले आहे

चिमुकली शाळेत जायला तयार नव्हती; पालकांनी विचारताच उघडकीस आली अत्याचाराची घटना
नांदेड: दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीवर शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकास ताब्यात घेतले असून पोक्सो व अन्य कलमान्वंये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका शाळेत ७ वर्षीय मुलगी दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. या शाळेतील शिक्षकाने १९ नोव्हेंबर रोजी मुलीस गाठून तिच्यासोबत अत्याचार केला. त्याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास मारहाण करेल असे धमकावले. दरम्यान, गुरुवारी सकाळी मुलगी शाळेत जायला तयार नव्हती. पालकांनी विचारणा केली असता घडला प्रकार सांगत मला शाळेत जायला भिती वाटत असल्याचे तिने सांगितले.
पालकांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भाग्यनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी उपरोक्त शिक्षकास तात्काळ अटक केली. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक प्रशांत शेळके यांनीही भाग्यनगर ठाण्यास भेट देवून तपासाच्या सूचना केल्या.