किनवट: राजकारणात कोण कधी कोणत्या पक्षाचा झेंडा हाती धरेल याचा नेम नाही. किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीत तसेच झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आलेले तुल्यबळ उमेदवार किनवटचे माजी नगराध्यक्ष साजीद खान यांनी ऐनवेळी सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरण बदलणार आहे. त्यातच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे) यांची युती झाल्यात जमा झाली आहे. मात्र आघाडीचे कोणतेही चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याला १० नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. कोणत्याही पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी वेळीच उमेदवार जाहीर केले नाही. ऐनवेळी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाचे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले. तत्पूर्वी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष साजीद खान यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण ऐनवेळी साजीद खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सामील झाल्याने आता निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रीशा गिरीष नेम्मानीवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी व वंचित बहुजन आघाडी कडून सायरा शब्बीर शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे त्यांची आजघडीला आघाडी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तरी शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची आघाडी झाली असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुजाता विनोद एंड्रलवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Web Summary : In Kinwat, a Nationalist Congress Party (Sharad Pawar) mayor candidate, Sajid Khan, switched to Ajit Pawar's NCP at the last minute, changing the election dynamics. BJP, NCP (Ajit Pawar), and Shiv Sena (Shinde) are likely to form an alliance, while Congress and VBA candidates have filed nominations independently.
Web Summary : किनवट में, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार) के महापौर उम्मीदवार साजिद खान ने अंतिम समय में अजित पवार की NCP में शामिल होकर चुनाव समीकरण बदल दिए। भाजपा, NCP (अजित पवार), और शिवसेना (शिंदे) गठबंधन कर सकते हैं, जबकि कांग्रेस और वीबीए उम्मीदवारों ने स्वतंत्र रूप से नामांकन दाखिल किया है।