शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

मुलींच्या शिक्षणाला एसटीचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:23 AM

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी शासन विविध योजना राबवित असले तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे़ मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात ८ हजार विद्यार्थिनींसाठी मोफत बस सुविधा सुरू केली आहे़

ठळक मुद्देशिक्षणाची हेळसांड मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील मुलींना बसेसची पास मिळेना

भारत दाढेल।

नांदेड : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी शासन विविध योजना राबवित असले तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे़ मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात ८ हजार विद्यार्थिनींसाठी मोफत बस सुविधा सुरू केली आहे़ मात्र आगारप्रमुख व शाळाप्रमुखांच्या अनुत्साहामुळे १३ दिवसांपासून मुलींना बसेसची पास मिळत नसल्याने त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे़जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या हस्ते १७ जून रोजी मोफत बस योजनेचा प्रारंभ हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा येथून करण्यात आला़ या योजनेतंर्गत ६३ आकाशी रंगाच्या बसेसचे नियोजन केले आहे़किनवट, हिमायतनगर, भोकर, बिलोली, धर्माबाद, देगलूर, उमरी, मुदखेड व लोहा या तालुक्यांतील गावे, वाडी, वस्ती, तांड्यावरील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या बसेसची मदत होणार आहे़ एकूण ५३० गावांतील ८ विद्यार्थिनी मानव विकासच्या बसेसने शाळेला जाणार आहेत़ परंतु, या उपयुक्त योजनेला काही आगारप्रमुख व मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षामुळे खीळ बसली आहे़ शाळा सुरू होवून १३ दिवस झाले़ मात्र अद्याप मुलींना मोफत बस सुविधेची पास मिळाली नाही़ त्यामुळे या मुलींना शाळेला जाण्यासाठी तिकीट काढून जावे लागत आहे़ अनेक पालकांनी शाळा दूर असल्याचे कारण पुढे करून मुलीच्या सुरक्षेच्या कारणावरून शाळा बंद केली आहे़तर काही पालकांनी आर्थिक परिस्थितीमुळे मुलींना शाळेत पाठविणे बंद केले आहे़ एकीकडे शासन मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवित आहे़ दुर्गम भागातील मुलींनाही शिक्षणाची सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी योजनांची निर्मिती केली जात आहे़ तर दुसरीकडे या योजनांचे गांभीर्य न बाळगणारे स्थानिक प्रशासन उभे आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत़ शिक्षण नसल्यामुळे या मुलींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत आहे़ अनेक शाळांत स्वतंत्र स्वच्छतागृह, शौचालये नसल्यामुळे मुलींची गैरसोय होत आहे़त्यामुळे या मुलींना शाळा सोडावी लागत आहे़ घरापासून दूर अंतरावर असलेल्या शाळेत मुलीला पाठविण्यास पालक तयार नाहीत़ सुरक्षेच्या कारणामुळे अनेक मुलींना शाळा सोडून घरी बसावे लागत आहे़ दहावी, बारावीनंतर शिक्षण सोडून घरी राहणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे़ अशावेळी मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याऐवजी काही अधिकारी, शाळा प्रशासन आहे त्या योजनेचा बोजवारा उडवित आहेत़ जिल्ह्यातील मुलींची शाळेतील गळती रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी त्या योजनांचा लाभ मुलींना मिळत नसल्याचे चित्र आहे़ ग्रामीण भागातील मुलींची शिक्षणातील होणारी पिछेहाट रोखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले़जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले निर्देशग्रामीण भागातील मुलींना बसच्या पास वेळेवर मिळत नसल्याची बाब जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना कळताच त्यांनी आगार प्रमुखांना पास तातडीने वितरीत करण्याच्या सूचना दिल्या़ काही वाहक बसमध्ये मुलींकडून तिकिटाचे पैसे घेत आहेत़ हे तिकीट जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत़ दरम्यान,जिल्हाधिकारी कार्यालयातील मानव विकासच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी मुदखेड तालुक्यातील काही मार्गावर तपासणी केली़यामध्ये अनेक मुुलींना बसच्या पास नसल्याचे निदर्शनास आले़ मुख्याध्यापकांचा पाठपुरावा करण्यास टाळाटाळ व आगार प्रमुखांच्या मनमानीमुळे मुलींना पासपासून वंचित राहावे लागत आहे़ मुलींना पाससाठी आगार प्रमुखांकडे पाठवू नका, शाळेतच मुलींना पास द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डोंगरे यानी दिल्या आहेत़ दरम्यान, मुलींना पास देण्याची प्रक्रिया मुख्याध्यापक, आगारप्रमुख राबवित नसल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे़‘पाससाठी मुलींना आगारप्रमुखाकडे पाठवू नका’मानव विकास योजनेतंर्गत मुलींना मोफत बस सुविधा देण्यासाठी आगार प्रमुखांकडून पास देण्यात येते़ यासाठी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील ये-जा करणा-या मुलींची यादी आगारप्रमुखांना पाठविणे आवश्यक आहे़ या यादीनुसार आगारप्रमुख पास तयार करून त्या शाळेत पाठवितो़शाळेतील मुख्याध्यापक मुलींना पासचे वाटप करतो़ या पद्धतीने पासचे वितरण केले जाते़ मात्र ही प्रक्रिया केवळ कागदावरच आहे़ प्रत्यक्षात मुलींनाच पाससाठी आगार प्रमुखांकडे जावे लागत आहे़ या ठिकाणी मुलींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे़ त्यासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे़ या वेळेत त्यांना शाळेत जाण्यास मिळत नाही़ दरम्यान, मुलींना गावाकडून शाळेत बसने येण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहे़ बसवाहक पास नसल्याने मुलींकडून तिकिटाचे पैसे घेत आहे़घरापासून दूर अंतरावर असलेल्या शाळेत मुलीला पाठविण्यास पालक तयार नाहीत़ सुरक्षेच्या कारणामुळे अनेक मुलींना शाळा सोडून घरी बसावे लागत आहे़ दहावी, बारावीनंतर शिक्षण सोडून घरी राहणाºया मुलींची संख्या वाढत आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारीEducationशिक्षणStudentविद्यार्थी